राहूरी(वेबटीम) राहूरी तालुक्यात दिवसेंदिवस कोरोना रुग्णसंख्या दिवसेंदिवस झपाट्याने वाढत असल्याने नागरिकांमध्ये भितीचे वातावरण निर्माण झाल...
राहूरी(वेबटीम)
राहूरी तालुक्यात दिवसेंदिवस कोरोना रुग्णसंख्या दिवसेंदिवस झपाट्याने वाढत असल्याने नागरिकांमध्ये भितीचे वातावरण निर्माण झाले होते.परंतू गेल्या दोन दिवसात देवळाली प्रवरा व राहूरी फॅक्टरी परिसरात कोरोनाचे रूग्ण संख्या घटली देवळाली प्रवरात व राहूरी फॅक्टरी येथे 15 कोरोना बाधीत रूग्ण आढळून आले आहेत. दोन दिवसात कोरोना बाधित रुग्ण संख्या घटली असली तरी ही नागरिकांनी काळजी घ्यावी मास्क, सँनिटायझर, सामाजिक अंतर ठेवणे आदी बाबत दक्षता घ्यावी.
>

राहूरी तालुक्यात दररोज मोठ्या प्रमाणात कोरोना रूग्ण सँख्या वाढत आहे. आज शनिवारी तालुक्यात दिवसभरात 183 कोरोना रूग्ण आढळून आले आहेत.
तर देवळाली प्रवरात व राहूरी फॅक्टरीत गेल्या दोन दिवसात अवघे 15 कोरोना रूग्ण आढळून आले आहेत. दोन दिवसात रुग्ण संख्या घटली असल्याने शहरातील नागरिकांना दिलासा मिळाला आहे.गेल्या दोन दिवसात रुग्ण संख्या घटली असली तरी नागरिकांनी घराबाहेर न पडता स्वतःची व कुटुंबाची काळजी घेणे गरजेचे आहे.

कोणत्याही टिप्पण्या नाहीत