निळवंडेचा संघर्ष राहाता तालुक्याला नवा नाही - जनार्दन घोगरे पाटील - आवाज जनतेचा

Page Nav

HIDE

Grid

GRID_STYLE

Classic Header

{fbt_classic_header}

News

latest

निळवंडेचा संघर्ष राहाता तालुक्याला नवा नाही - जनार्दन घोगरे पाटील

   राहुरी : प्रतिनिधी          राहाता तालुक्यातील निळवंडे लाभक्षेत्रातील शेतकऱ्यांना निळवंडेचा संघर्ष नवा नाही. पन्नास वर्षापासुन प...

 

 राहुरी : प्रतिनिधी         


राहाता तालुक्यातील निळवंडे लाभक्षेत्रातील शेतकऱ्यांना निळवंडेचा संघर्ष नवा नाही. पन्नास वर्षापासुन पाण्यासाठी लाभक्षेत्रातील शेतकऱ्यांना प्रस्तापितांसोबत मोठा संघर्ष कायमचं वेळोवेळी करावा लागला आहे. त्यातुन अनेक वेळा मोठा शारिरीक व मानसिक त्रास लाभक्षेत्रातील शेतकऱ्यांना झाला हा संघर्ष जनु काय निळवंडे लाभक्षेत्रातील शेतकऱ्यांच्या पाचवीलाचं पुजलेला आहे का? असा प्रश्न वर्षानुवर्ष लाभक्षेत्रातील शेतकऱ्यांला पडतो अशी प्रतिक्रीया लोणी खुर्द गावाचे सरपंच जनार्दन घोगरे यांनी दिली.

.


ते म्हणाले राज्याच्या इतिहासात निळवंडे हा एकमेव असा प्रकल्प आहे की, पहिले शंभर टक्के पुनर्वसन व नंतर धरण असे आहे. नामदार बाळासाहेब थोरात यांच्या दूरदृष्टीतून धरणाच्या भिंतीचे काम पुर्ण झालेले आहे. त्यामुळेच आज धरणात पुर्ण क्षमतेने पाणी अडवले जाते.


राज्यात महाविकास आघाडीचे सरकार असुन महाराष्ट्राचे महसूल मंत्री नामदार बाळासाहेब थोरात यांनी पाठपुरावा करुन अर्थसंकल्पात ४७६ कोटी रुपयांची भरीव तरतूद केलेली आहे. निळवंडे लाभक्षेत्रातील शेतकऱ्यांची पन्नास वर्षाची पाणी येण्याची अशा पुन्हा एकदा पल्लवित झाली.


 निळवंडे लाभक्षेत्रातील शेतकऱ्यांच्या शेतात पाणी पोहचले पाहिजे लाभक्षेत्रातील शेतकरी सर्वार्थाने समृध्द झाला पाहिजे यासाठी जिल्हातील दिवंगत सहकार महर्षी भाऊसाहेब थोरात, काॅ दत्ता देशमुख, आ चंद्रभानदादा घोगरे, डाॅ आण्णासाहेब शिंदे, खा.गोविंदराव आदिक, आ का.ल.पवार, यांनी फार मोठे योगदान दिले असुन ते अविस्मरणीय आहे.


निळवंडे धरणाच्या व कालव्याच्या कामावरुन मोठे राजकारण आजपर्यंत झाले अनेक निवडणुक निळवंडेच्या नावावर लढल्या मात्र निळवंडे चा फक्त राजकारणासाठी वापर काही लोकांनी वर्षानुवर्ष केला लाभक्षेत्रातील शेतकऱ्यांना कोणीही न्याय दिला नाही. याउलट तालुक्यातील खडकेवाके गावात निळवंडे चे पाणी द्या असे निवेदन तत्कालीन मुख्यमंत्र्यांना दिले म्हणुन लाभक्षेत्रातील शेतकर्‍यांवर पोलिसांकरवी केलेली आमानुष मारहाण आजही लाभक्षेत्रातील प्रत्येक जनमानसाच्या स्मरणात आहे.


 आज कोव्हिड ची पार्श्वभूमी असताना निळवंडे पाटपाणी कृती समितीच्या पाठपुराव्याने शासनाच्या जलसंपदा विभागाने निळवंडे डाव्या कालव्याच्या निर्मळ पिंपरी - लोणी खुर्द हद्दीतील महावितरण च्या ४०० के.व्ही जवळ चे पृच्छ काम सुरु करण्याचे आदेश दिलेले आहे परंतु ठेकेदारांच्या वादात हे काम बंद होते म्हणून खा.लोखंडे यांनी दुपारी दोन वाजता कामाच्या साईटवर येवुन वाद मिटवुन बंद काम सुरु करुन दिले यात गैर काय? मुळात: पोलीस प्रशासनाने कोणतीही कारवाई करताना त्यातील सर्व बाजु सर्व अंगाने तपासने आवश्यक असताना देखील लोकप्रतिनीधीसह शेतकऱ्यांवर गुन्हे दाखल करणे हे संयुक्तिक वाटत नाही.


 खा लोखंडे यांनी कालव्यांच्या कामासाठी मोठा पाठपुरावा केला आहे. निळवंडे कालव्याचा प्रश्न हा शेतकऱ्यांच्या जीवन मरणाचा आहे. पन्नास वर्ष लाभक्षेत्रातील शेतकरी पाण्यावाचून वंचीत आहे. शेतकऱ्यांच्या शेतात पाणी पोहचवण्याचे उद्दिष्ट महाविकास आघाडी सरकारचे आहे ही लाभक्षेत्रातील शेतकऱ्यांच्या दृष्टीने आनंददायी व लाभदायक बाब आहे. अशी भावना लोणी खुर्द ग्रामपंचायत चे सरपंच जनार्दन घोगरे यांनी व्यक्त केली.

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत