राहुरी : वेबटीम राहुरी शहरातील 18 एकर भूखंड आणि पत्रकार दातीर हत्या प्रकरण चर्चा सुरू असताना आता गणेगाव शिवारातही एका भूखंड खरे...
राहुरी : वेबटीम
राहुरी शहरातील 18 एकर भूखंड आणि पत्रकार दातीर हत्या प्रकरण चर्चा सुरू असताना आता गणेगाव शिवारातही एका भूखंड खरेदीत डॉक्टरची मोठी फसवणूक केल्याप्रकरणी या व्यवहारात सहभागी असलेल्या 14 जणांविरुद्ध न्यायालयात काही दिवसांपूर्वी तक्रार देण्यात आल्याचे समजते. दरम्यान, यात पत्रकार दातीर हे साक्षीदार होते, तर दातीर हत्येतील काही संशयित हे आरोपी होते, याशिवाय एका युवा नेत्याचे त्या डॉक्टरच्या तक्रारीत मध्यस्थी करून फसवणूक केले म्हणून आरोपीत नाव दिले होते, अशी माहिती मिळाल्याने तालुक्यात पुन्हा चर्चा सुरू आहेयाबाबतची माहिती अशी की, राहुरी शहरातील एका डॉक्टरने आपल्या संस्थेसाठी व साई मंदिर उभारण्यासाठी 2019 मध्ये गणेगाव शिवारात काही जमीन व्यवहार केला होता. यात 6 जमिनीचे मालक होते, एक राजकीय पक्षाचा युवानेता व अन्य एक असे 2 मध्यस्थी होते. तर अन्य 6 जण या व्यवहारात खरेदीसाठी रीतसर परवानगी मिळवून देणेकामी सहभागी होते. १४ जणांनी मिळुन ज्या जमिनीचे यापूर्वीही काही इसार व्यवहार झाले आहेत, तसेच या जमिनीचा वन विभागात समावेश असल्याने त्याची विक्री होऊ शकत नाही, हे माहिती असतानाही या 14 जणांनी मिळून आपली फसवणूक केल्याचे तक्रारीत म्हंटले होते. तसेच या मोबदल्यात 13 लाखापेक्षा अधिक रक्कमेची फसवणूक झाल्याचेही कोर्टात दिलेल्या फिर्यादीत म्हंटलेले आहे.

कोणत्याही टिप्पण्या नाहीत