कोपरगाव(प्रतिनिधी) कोपरगाव तालुक्यातील पोहेगाव येथिल प्राथमिक आरोग्य केंद्रात लसीकरण मोहिमेने वेग घेतला असुन पोहेगाव आरोग्य केंद्राचे अधिक...
कोपरगाव(प्रतिनिधी)
कोपरगाव तालुक्यातील पोहेगाव येथिल प्राथमिक आरोग्य केंद्रात लसीकरण मोहिमेने वेग घेतला असुन पोहेगाव आरोग्य केंद्राचे अधिकारी डॉक्टर नितीन बडदे यांच्या मार्गदर्शनाखाली नियोजनबद्ध रीतीने प्राथमिक आरोग्य केंद्र पोहेगांव सर्व स्टाफ ,सर्व आशा सेविकांच्या मदतीने उत्तम प्रकारे नियोजन करून कोविशिल्ड लस देण्यात येत आहे.
कोपरगाव तालुक्यात कोरोना साथीने थैमान घातले असुन आरोग्य अधिकारी व कर्मचारी साथ आटोक्यात आणण्यासाठी कसोशीने प्रयत्न करीत आहेत रूग्ण शोधुन उपचारासाठी पाठविले जात आहेत तसेच जनजागृती करून मोठ्या प्रमानात लसीकरण मोहीम सुरु आहे
पोहेगाव प्राथमिक आरोग्य केंद्रात प्रथम बाहेरच नोंदणी करुन गर्दी होऊ नये यासाठी प्राथमिक आरोग्य केंद्राचा स्टाफ प्रयत्न करतात सामाजिक अंतर पाळत योग्य नियोजन करून याठिकाणी लसीकरण सुरू असल्याचे डॉ.नितीन बडदे यांनी सांगितले व या कठीण काळात आरोग्य कर्मचारी करीत असलेल्या नियोजन बध्द कामाबद्दल समाधान व्यक्त केले आहे
पोहेगाव येथील प्रथम लोकनियुक्त सरपंच अमोल औताडे ,पंचायत समिती सदस्य बाळासाहेब रहाणे,सरपंच बाबुराव थोरात, माजी सरपंच कैलास रहाणे,पत्रकार विनोद जवरे यांच्यासह परिसरातील शहापूर, बहादरबाद,जवळके,धोंडेवाडी,वेस,अंजनपूर, राजणगाव देशमुख, बहादरपुर येथील असंख्य नागरिकांनी ही लस घेतली असुन बुधवारी 30 एप्रिल रोजी उच्चांक नोंदवत 3000 च्या वर नागरिकांनी लसीकरण करून घेतले आहे आरोग्य अधिकारी व नर्स ,औषध निर्माता व सर्व स्टाफ करीत असलेल्या योग्य नियोजनाबद्दल परीसरांचा वतीने आरोग्य कर्मचाऱ्यांना धन्यवाद देत आभार मानले आहेत


कोणत्याही टिप्पण्या नाहीत