राहुरी/प्रतिनिधी राहुरी तालुक्यात कोरोना रूग्णांमधे झपाट्याने वाढ होत आहे.बहुतेक ठिकाणी रूग्णालयात देखील उपचारासाठी जागा मिळत नाही. त्...
राहुरी/प्रतिनिधी
राहुरी तालुक्यात कोरोना रूग्णांमधे झपाट्याने वाढ होत आहे.बहुतेक ठिकाणी रूग्णालयात देखील उपचारासाठी जागा मिळत नाही. त्यामुळे बहुतेक रूग्ण हे घरीच उपचार घेत असल्याचे समोर येत आहे.त्यामुळे तहसीलदार फसियोद्दीन शेख यांनी गाव तेथे क्वारटाईन सेंटर उभारण्यासाठी पुढाकार घेतला असुन त्यादृष्टीने संमधीताना सुचना देखील केल्या आहे.
रविवार सायंकाळी झालेल्या VC मधे हा निर्णय घेण्यात आला आहे.या VC मधे प्रशिक्षणार्थी प्रांत अधिकारी दयानंद जगताप,तहसीलदार फसियोद्दीन शेख,गट विकास अधिकारी गोविंद खामकर,मंडलाधिकारी दत्ता गोसावी, तालुका वैद्यकीय अधिकारी दिपाली गायकवाड,विविध विभागातील मंडलाधिकारी,तलाठी, ग्रामसेवक, पोलिस पाटील आदिं सहभागी झाले होते.गावांमधील सौम्य लक्षणे असणारे व रूग्णांच्या संपर्कात आलेल्यांना आता गावातीलच जिल्हा परिषदेच्या शाळेमधे कांरटाईन करण्यात येनार आहे.यामधे प्रामुख्याने सरपंच, पोलिस पाटील, तलाठी, ग्रामसेवक,ग्रामपंचायत शिपाई,कोतवाल,अंगणवाडी सेविका,आशा सेविका आदिंना नेमूनक करण्यात येणार आहे.त्यामुळे आता जिल्हा परिषद शाळेचा ऊपयोग क्वारंटाईन सेंटर म्हणून केला जानार आहे.त्यामुळे आता रूग्ण संख्या देखील आटोक्यात आणण्यास मदत होणार आहे.
माझे कुटुंब माझी जबाबदारी प्रभावीपणे राबविणार,तहसीलदार शेख
विभागीय आयुक्त नाशिक यांच्या संकल्पनेतून राहुरी तालुक्यामध्ये माझ्या कुटुंबाची जबाबदारी सर्वेक्षण सुरू करणार असून त्यामध्ये लॉक डाउन फेस वन मध्ये ज्या पद्धतीने घरोघरी जाऊन लोकांच्या तपासण्या केल्या होत्या त्या पद्धतीने तपासणी करण्यात येणार असून त्यामध्ये ऑक्सीजन लेवल किती आहे इतर लक्षणे आहेत काय त्याचबरोबर घरी एखादा पॉझिटिव्ह रुग्ण तर नाही ना याची तपासणी सदरचे पथक करणार आहे. सदाच्या पथकामध्ये आशा सेविका अंगणवाडी सेविका तसेच शिक्षक यांचा समावेश राहणार असून सदरच्या पथकास पल्स ऑक्सी मिटरमिटर थर्मल स्कॅनर व इतर अनुषंगिक साहित्य संबंधित ग्रामपंचायत मार्फत पुरविण्यात येणार आहे. राहुरी तालुक्यात एकूण दोनशे आशा सेविका असून जवळपास साडेतीनशे अंगणवाडी सेविका व 700 ते 800 प्राथमिक शिक्षक असून अंगणवाडी सेविका यांच्या संख्येत क्या म्हणजेच 200 पथकांची ग्रामीण भागांमध्ये स्थापना करण्यात येणार असून प्रत्येक पथकामध्ये आशा अंगणवाडी सेविका आणि शिक्षक यांचा समावेश असणार आहे सदरचे सर्वेक्षण दिनांक 28 एप्रिल पासून दोन मे या पाच दिवसांत दरम्यान होणार असून एक पथक साधारणपणे हजार लोकांची तपासणी पाच दिवसांमध्ये करणार आहे राहुरी तालुक्यात जवळपास 52 हजार 200 कुटुंबे ग्रामीण भागात राहत असून त्यांची एकूण लोकसंख्या साधारणपणे दोन लाख 75 हजार तर नगरपालिका क्षेत्रामध्ये राहणाऱ्या कुटुंबांची संख्या 15000 च्या जवळपास असून लोकसंख्या साधारणपणे 71 हजार इतकी आहे पुढील पाच दिवसांमध्ये जवळपास तीन लाख 46 हजार लोकसंख्येची या सर्वेक्षणाच्या माध्यमातून तपासणी होणार आहे आणि या तपासणी दरम्यान ज्या लोकांना लक्षणे दिसतील त्यांची त्वरित तपासणी करून त्यांच्यावर वेळेत उपचार करण्यात येणार आहेत सदरच्या सर्वेक्षणास सर्व नागरिकांनी सुद्धा सहकार्य करावे जेणेकरून वेळेवर रोगाचे निदान आपल्याला करता येईल असे आव्हान तालुका प्रशासनामार्फत करण्यात आली आहे.


कोणत्याही टिप्पण्या नाहीत