अकोले : प्रतिनिधी तालुक्यातील सुगाव खुर्द प्राथमिक आरोग्य केंद्रात करोना रुग्णांसाठी 50 ऑक्सिजन बेडचे कोव्हीड सेंटर सुरू करण्यासाठी ता...
अकोले : प्रतिनिधी
तालुक्यातील सुगाव खुर्द प्राथमिक आरोग्य केंद्रात करोना रुग्णांसाठी 50 ऑक्सिजन बेडचे कोव्हीड सेंटर सुरू करण्यासाठी तालुक्यातील प्राथमिक व माध्यमिक शिक्षक सरसावले आहेत. काल आमदार डॉ किरण लहामटे यांच्या उपस्थितीत पं स सभागृहात झालेल्या झालेल्या बैठकीत या निर्णयावर शिक्कामोर्तब करण्यात आला.याशिवाय गाव पातळीवर ग्राम सुरक्षा समित्यांची स्थापना,करोना लसीकरण व रुग्णांना येत असणाऱ्या अडचणींसाठी अकोलेत मदत कक्ष सुरू करण्याचा तसेच वैद्यकीय अधीक्षक संजय घोगरे यांना पुन्हा अकोलेत आणण्यासाठी प्रयत्न करण्याचा निर्णय ही या बैठकीत घेण्यात आला
.
या बैठकीस ज्येष्ठ नेते सिताराम पाटील गायकर, तहसीलदार मुकेश कांबळे, उद्योजक सुरेश गडाख,राष्ट्रवादी चे जिल्हा उपाध्यक्ष सुरेश खांडगे, माजी सरपंच संपतराव नाईकवाडी,तालुका आरोग्य अधिकारी डॉ इंद्रजीत गंभीरे, सुगाव प्राथमिक आरोग्य केंद्र चे वैद्यकीय अधिकारी डॉ श्यामकांत शेटे,मंडलाधिकारी बाबासाहेब दातखिळे आदी उपस्थित होते.
यावेळी काँग्रेस चे ज्येष्ठ नेते मधुकरराव नवले, माकप चे नेते डॉ अजित नवले,अगस्ति कारखान्याचे संचालक महेशराव नवले, उद्योजक नितीन गोडसे,सेनेचे तालुकाप्रमुख मच्छीन्द्र धुमाळ, माधवराव तिटमे,नगरसेवक सचिन शेटे,पत्रकार अमोल वैद्य,गणेश आवारी ,काँग्रेसचे जिल्हा सरचिटणीस शिवाजीराव नेहे,राष्ट्रवादी चे तालुकाध्यक्ष भानुदास तिकांडे, माध्यमिक शिक्षक सोसायटी चे संचालक अण्णासाहेब ढगे, शिक्षक नेते राजेंद्र सदगीर, सेनेचे शहर प्रमुख नितीन नाईकवाडी, युवा कार्यकर्ते अजय वर्पे आदिनी विविध सूचना केल्या.


कोणत्याही टिप्पण्या नाहीत