समशेरपूर येथे 'माजीमंत्री मधुकरराव पिचड आरोग्य मंदिर'चे मंगळवारी उदघाटन - आवाज जनतेचा

Page Nav

HIDE

Grid

GRID_STYLE

Classic Header

{fbt_classic_header}

News

latest

समशेरपूर येथे 'माजीमंत्री मधुकरराव पिचड आरोग्य मंदिर'चे मंगळवारी उदघाटन

    अकोले : प्रतिनिधी                             आढळा परिसरात कोरोनाचे रुग्ण मोठ्या प्रमाणावर वाढत असल्याने  नागरिकांना मोठा त्रास सहन कराव...

 

 

अकोले : प्रतिनिधी 


                         

 आढळा परिसरात कोरोनाचे रुग्ण मोठ्या प्रमाणावर वाढत असल्याने  नागरिकांना मोठा त्रास सहन करावा लागत होता.ही गोष्ट लक्षात घेत माजी आमदार वैभवराव पिचड यांच्या मार्गदर्शनाखाली धर्मवीर आनंद दिघे इंग्लिश मेडीअम स्कुल विरगावचे संस्थापक अध्यक्ष तथा अमृतसागरचे व्हा.चेअरमन यांनी माजी मंत्री मधुकरराव पिचड आरोग्य मंदिर' या नावाने कोविड सेंटर व रुग्णांसाठी ऑक्सिजनचे दहा बेड  समशेरपूर येथे सुरू करण्यात येणार असून त्याचे उदघाटन मंगळवार दिनांक २७ एप्रिल २०२१ रोजी माजीआमदार वैभवराव पिचड यांच्या शुभहस्ते होणार आहे.

          आढळा परिसरात कोरोनाची परिस्थिती अतिशय भयानक बनली असून कोरोना बधितांची संख्या दररोज वाढत आहे.अनेक नागरिक मृत्युमुखी पडले आहेत.अनेक रुग्ण हॉस्पिटल मध्ये कोरोनाशी झुंज देत आहे.इतकी भयानक परिस्थिती असताना या भागात  सरकारच्या माध्यमातून प्रशासनाने कोणतीही व्यवस्था करण्यात आली नाही.या भागातील कार्यकर्त्यांनी अनेकवेळा मागणी करूनही दखल घेतली गेली नाही.ही बाब आढळेतील कार्यकर्त्यांनी अमृतसागरचे व्हा.चेअरमन रावसाहेब वाकचौरे यांना कळविली असता त्यांनी ताबडतोब माजी आमदार वैभवराव पिचड यांच्या माध्यमातून दहा ऑक्सिजन बेड व १०० बेड चे कोविड सेंटर समशेरपूर येथे सुरू करण्याचा निर्णय घेतला.माजी आमदार वैभवराव पिचड यांच्या वाढदिवशी म्हणजे मंगळवार दि.२७ एप्रिल २०२१ रोजी याकोविड सेंटर चे उदघाटन माजी आमदार वैभवराव पिचड यांच्या शुभहस्ते व धर्मवीर आनंद दिघे इंग्लिश मेडीअम स्कुल चे संस्थापक अध्यक्ष रावसाहेब वाकचौरे यांच्या उपस्थितीत होणार आहे.

     या कोविड सेंटरचा उपयोग आढळा परिसरातील कोरोना रुग्णासाठी होणार आहे.ऑक्सिजन चे दहा बेड ग्रामीण रुग्णालयात सुरू करण्यात येणार असून यामुळे रुग्णांना दिलासा मिळणार आहे.

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत