अकोले : प्रतिनिधी रूंभोडी येथील ८६ वर्षीय वृध्द काशिनाथ मालुंजकर यांनी प्रबळ इच्छाशक्तीच्या बळावर कोरोनावर मात केली आहे. या कोरोना...
अकोले : प्रतिनिधी
रूंभोडी येथील ८६ वर्षीय वृध्द काशिनाथ मालुंजकर यांनी प्रबळ इच्छाशक्तीच्या बळावर कोरोनावर मात केली आहे.या कोरोना बाधिताने अकोले येथे खाजगी कोविड हॉस्पिटलमध्ये पाच दिवस उपचार घेतले. उपचार सुरू असताना त्यांनी आपल्या मुलांकडे मला घरी घेवून चला, मी घरीच बरा होईल असा हट्ट धरला. मग त्यांच्या इच्छेवरून ऑक्सिजनपातळी ८५ असताना त्यांना घरी आणले गेले.त्या रात्री ते अंगणात झाडाखाली झोपले, ऑक्सिजनपातळी ८० झाली.आग्रह करून देखील ते परत दवाखान्यात गेले नाही. दिवसभर झाडांच्या सावलीत झोपून राहिले आणि त्यांची ऑक्सिजनपातळी ९० झाली. नंतर तिसऱ्या दिवशी ऑक्सिजन लेव्हल ९५ वर गेली.प्रबल सकारात्म इच्छाशक्ती यामुळे हे शक्य झाले असावे. त्यांनी या कालावधीत लिंबू आणि लिंबू सरबत याचे खुप सेवन केल्याचे समजते. आता दहा- बारा दिवस झाले त्यांची प्रकृती ठणठणीत झालीआहे


कोणत्याही टिप्पण्या नाहीत