देवळाली प्रवरा प्रतिनिधी एक कोटी पेक्षा जास्त थकबाकी असणाऱ्या विविध कार्यकारी सोसायटींचा कर्ज पुरवठा जिल्हा बँकेने थांबविला असून प्र...
देवळाली प्रवरा प्रतिनिधी
एक कोटी पेक्षा जास्त थकबाकी असणाऱ्या विविध कार्यकारी सोसायटींचा कर्ज पुरवठा जिल्हा बँकेने थांबविला असून प्रामाणिक पणे मार्च अखेर कर्ज भरणाऱ्या शेतकऱ्यांची जिल्हा बँकेने शेतकऱ्यांची आर्थिक कोंडी केली आहे.संचालक मंडळाने प्रामाणिकपणे कर्ज भरणाऱ्या शेतकऱ्यांना पुन्हा कर्ज वितरण करावे अन्यथा आंदोलनाचा पविञा घ्यावा लागेल असा इशारा कणगर ग्रामपंचायतीचे सरपच सर्जेराव घाडगे यांनी दिला आहे.
घाडगे यांनी जिल्हा बँकेचे अध्यक्ष उदय शेळके यांना पाठविलेल्या निवेदनात सांगितले आहे. कणगर येथील विविध कार्यकारी सेवा सोसायटी जिल्हा बँकेची सभासद असुन सोसायटी आपल्या कडून कर्ज घेवून सोसायटी सभासदांना वाटप करते. सोसायटीच्या 80 टक्के सभासदांनी सोन्याचे दागिने, दुधावर अँडव्हान्स, उसणे पासणे करुन सोसायटीचे कर्ज भरलेले आहे.परंतू जिल्हा सहकारी बँकेने माञ ज्या सोसायटीकडे 1 कोटी पेक्षा जास्त कर्ज थकबाकीत आहे. त्यांचा कर्ज पुरवठा थांबवला आहे.ज्या सभासदांनी नियमित कर्ज भरणा केला आहे. त्यांची यामध्ये काय चुक आहे.
जिल्हा बँकेच्या संचालक मंडळाने नियमित कर्ज भरणाऱ्या सभासदांना कर्ज वितरण करावे. कणगर सोसायटीची 59 लाख रुपये अनिष्ट तफावत आहे.सोसायटी थकबाकीत असल्याची चुक प्रामाणिकपणे कर्ज भरणाऱ्या सभासदांच्या माथी का मारली जाते. शेतकरी सभासद यांना कर्ज वितरण होणे गरजेचे आहे.अन्यथा शेतकरी आत्महत्या करतील.त्यामुळे जिल्हा बँकेने पिक व पशु पालन कर्ज वितरण लवकर करावे अन्यथा आंदोलनाचा पविञा हाथात घ्यावा लागेल.
जिल्हा बँकेच्या उद्या होणाऱ्या संचालक मंडळाच्या बैठकीत कर्ज वितरणाचा निर्णय घ्यावा सोसायटीच्या थकबाकीदार सभासदांना कर्ज वितरण करु नका पण प्रामाणिकपणे कर्ज भरणाऱ्या सभासदांना तातडीने कर्ज वितरण सुरु करावे अशी मागणी घाडगे यांनी केली आहे.

कोणत्याही टिप्पण्या नाहीत