राहूरी फॅक्टरी मनसेच्यावतीने प्लाझमा दान करण्याचे आवाहन - आवाज जनतेचा

Page Nav

HIDE

Grid

GRID_STYLE

Classic Header

{fbt_classic_header}

News

latest

राहूरी फॅक्टरी मनसेच्यावतीने प्लाझमा दान करण्याचे आवाहन

  राहूरी फॅक्टरी(वेबटीम) कोरोनाची ही महाभयंकर परिस्तिथी पाहता महाराष्ट्र नवनिर्माण सेनेच्या राहुरी फॅक्टरी शाखेच्या माध्यमातून अनेक रुग्णांन...

 राहूरी फॅक्टरी(वेबटीम)

कोरोनाची ही महाभयंकर परिस्तिथी पाहता महाराष्ट्र नवनिर्माण सेनेच्या राहुरी फॅक्टरी शाखेच्या माध्यमातून अनेक रुग्णांना प्लाझमा दान करण्यात आले. जे रुग्ण कोरोनातून बरे झाले आहेत त्या रुग्णांना नम्र विनंती आहे की आपण स्वतःहून प्लाझ्मा दान करण्यासाठी पुढे यावे जेणे करुन गोरगरीब रुग्णांचा जीव वाचेल ज्या योद्धांना प्लाझ्मा दान करायचा आहे त्यांनी ९५०३५४०२३२ या क्रमांकावर संपर्क साधावा असे आवाहन राहूरी फॅक्टरी मनसेच्यावतीने करण्यात आले आहे.


प्लाझ्मा दान करण्यासाठी चे नियम 

१) *सामान्यपणे कोण प्लाझ्मा दान करू शकतं?*

करोनाची बाधा होऊन बरा झालेला रुग्ण, जर १८ ते ५५ वयोगटातील असेल तर तो आजारपणानंतर ३० ते ४० दिवसांनंतर प्लाझ्मा दान करू शकतो. मात्र त्याच्या रक्ताची तपासणी करून त्यात किती प्रमाणात अॅण्टिबॉडीज आहेत, त्याला रक्तातून पसरणारे आजार तर नाहीत ना? याचे मोजमाप करूनच त्याचा प्लाझ्मा घेतला जातो. कमी अॅण्टिबॉडीज असल्यास त्या प्लाझ्माचा रुग्णाला उपयोग होणार नसल्याने अशा व्यक्तींना प्लाझ्मा दान करता येत नाही.


२) *सामान्यपणे प्लाझ्मा दान कोण करू शकत नाही?*

• करोना न झालेल्या व्यक्ती,

• ज्यांच्या शरीरात अगदी कमी प्रमाणात अॅण्टिबॉडीज आहेत अशा व्यक्ती,

• ५० किलोपेक्षा कमी वजन असलेल्या व्यक्ती,

• ६० वर्षावरील वयाच्या व्यक्ती,

• ज्यांचे हिमोग्लोबिन १२ ग्रॅम टक्क्यांपेक्षा कमी आहे अशा व्यक्ती

• एचआयव्ही, सिफिलीस, मूत्रपिंडारोपण झालेले रुग्ण, कर्करोग, ह्युमन टी सेल ल्युकेमिया व्हायरस1 ने बाधित झालेल्या व्यक्ती 

• क्षयरोग, हिपॅटायटिस बी, सी, इ झालेले रुग्ण,

• ज्यांची गेल्या सहा महिन्यात मोठी शस्त्रक्रिया झाली आहे असे रुग्ण,

• गरोदर स्त्रिया, गरोदरपणी ज्यांना करोना झाला आणि ज्यांना १ वर्ष किंवा त्याहूनही लहान वयाचे बाळ आहे अशा स्त्रिया

• ज्यांचा मधुमेह अनियंत्रित आहे किंवा ज्यांना गेल्या २८ दिवसात मधुमेहाच्या गोळ्या बदलाव्या लागल्या आणि इन्सुलिन घेणाऱ्या मधुमेही रुग्णांना देखील प्लाझ्मादान करता येत नाही.

• १४०/९० पेक्षा जास्त रक्तदाब असलेल्या व्यक्ती किंवा गेल्या २८ दिवसात ज्यांची रक्तदाबाची औषधे बदलावी लागली अशा व्यक्तींना प्लाझ्मादानाचे कार्य करता येत नाही.


कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत