राहुरी : प्रतिनिधी राहुरी तालुक्यातील सात्रळ धानोरे सोनगाव परिसरात कोरोनाचे थैमान सुरु असताना सात्रळ दूध डेरी ने कोणतेही सोशिअल डेस...
राहुरी : प्रतिनिधी
राहुरी तालुक्यातील सात्रळ धानोरे सोनगाव परिसरात कोरोनाचे थैमान सुरु असताना सात्रळ दूध डेरी ने कोणतेही सोशिअल डेस्टिनेशनचे नियम न पाळता सात्रळ चौकात मोठी गर्दी करून दूध विक्री चालू होती कोरोनाच्या पार्श्वभूमीवर तहसीलदार शेख यांनी सात्रळ परिसराला भेट देऊन अनेक दुकानदार तसेच अवैध व्यवसायाच्या ठिकाणी भेटी देऊन दंडात्मक कारवाई केली.
कोरोनाचे गांभीर्य लक्षात घेऊन काल सात्रळ धानोरे सोनगाव परिसरात काल भेट दिली असता सात्रळ येथील सात्रळ दूध डेरी च्या दूध सेंटर वर भेट दीली असता मोठी गर्दी आढळून आली तसेच या डेरी मालकाने सानिटीझर व कोरोना संदर्भातील कोणतेही काळजी घेताना दिसली नाही त्यामुळे त्यांच्यावर आम्ही दंडात्मक कारवाई केली आहे.
तहसीलदार शेख
यावेळी सात्रळ दूधचे मालक दिलीप गागरे यांना खडेबोल सुनावले. यावेळी तहसीलदार शेख म्हणाले कि, आज गरीब जनता कोरोना च्या महामारी मुळे संतप्त झाली असून तुम्हाला तुमचा धंदा प्रिय आहे शासनाने नियमाचे बंधन घालून देखील तुम्हाला त्याचे कोणतेही गांभीर्य नाही ही शोकांतिका आहे येथून पुढे असेच जर तुमचे कृत्य चालले तर शासन निर्णयानुसार तुमच्या डेरीवर मोठी कारवाई करण्यात येईल.


कोणत्याही टिप्पण्या नाहीत