देवळाली प्रवरा व राहुरी फॅक्टरीत 'इतके' कोरोना रूग्ण - आवाज जनतेचा

Page Nav

HIDE

Grid

GRID_STYLE

Classic Header

{fbt_classic_header}

News

latest

देवळाली प्रवरा व राहुरी फॅक्टरीत 'इतके' कोरोना रूग्ण

  राहूरी फॅक्टरी(वेबटीम) राहूरी तालुक्यात दिवसेंदिवस कोरोना रुग्णसंख्या दिवसेंदिवस झपाट्याने वाढत असून देवळाली प्रवरा व राहूरी फॅक्टरी परिसर...

 राहूरी फॅक्टरी(वेबटीम)

राहूरी तालुक्यात दिवसेंदिवस कोरोना रुग्णसंख्या दिवसेंदिवस झपाट्याने वाढत असून देवळाली प्रवरा व राहूरी फॅक्टरी परिसरात कोरोनाचे रूग्ण वाढतच  असून गेल्या तीन दिवसात देवळाली प्रवरात २३  तर राहूरी फॅक्टरी येथे ११ असे एकूण ३४  कोरोना बाधीत रूग्ण आढळून आले आहेत. तर अवघ्या ४ महिन्याच्या चिमुकल्याचा कोरोना टेस्ट पॉझिटिव्ह आढळून आली आहे.

 राहूरी तालुक्यात दररोज मोठ्या प्रमाणात कोरोना रूग्ण सँख्या वाढत आहे. आज गुरूवारी तालुक्यात दिवसभरात १५८  कोरोना रूग्ण आढळून आले आहेत.

 तर  देवळाली प्रवरात गेल्या तीन दिवसात २३ तर राहूरी फॅक्टरीत ११ कोरोना रूग्ण  याप्रमाणे ३४ कोरोना रूग्ण आढळून आले आहेत. तर शहरातील ४ महिन्याच्या एका चिमुकल्याची कोरोना टेस्ट पॉझिटिव्ह आल्याने कोरोनाची भीती दिवसेंदिवस वाढू लागली आहे.

 दरम्यान देवळाली प्रवरा येथे सहारा मंगल कार्यालयात शासकीय कोविड केअर सेंटर सूरु झाले असून सौम्य लक्षण असणाऱ्या रुग्णांवर मोफत उपचार या ठिकाणी केला जाणार असून अनेक रूग्ण गृहविलगिकरण कक्षात राहत असल्याने घरातील अन्य सदस्य बाधीत होऊन रूग्ण सँख्या झपाट्याने वाढत आहे. ती रोखण्यासाठी कोविड केअर सेंटर मध्ये दाखल व्हा असे आवाहन आ.लहू कानडे यांनी केले असतानाही अजून अनेक रूग्ण घरात थांबत असल्याचे चित्र देवळाली प्रवरा व राहूरी फॅक्टरी परिसरात बघावयास मिळत आहे. देवळाली नगरपालिका प्रशासनाने याबाबत जरा कठोर भूमिका घेणे आवश्यक बनले आहे.

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत