कणगर येथे आजपासून कोविड सेंटर सुरू होणार - आवाज जनतेचा

Page Nav

HIDE

Grid

GRID_STYLE

Classic Header

{fbt_classic_header}

News

latest

कणगर येथे आजपासून कोविड सेंटर सुरू होणार

  राहूरी फॅक्टरी(वेबटीम) राहूरी तालुक्यातील कणगर येथे आज मंगळवार २० एप्रिल पासून  नामदार प्राजक्तदादा तनपुरे यांच्या बहुमोल सहकार्याने शिवबा...

 राहूरी फॅक्टरी(वेबटीम)

राहूरी तालुक्यातील कणगर येथे आज मंगळवार २० एप्रिल पासून  नामदार प्राजक्तदादा तनपुरे यांच्या बहुमोल सहकार्याने शिवबा प्रतिष्ठाण,कै. संजय महाडिक फाऊंडेशन व डॉ.रवी घुगरकर व समस्त ग्रामस्थ कणगर यांच्या संयुक्त विद्यमाने अल्पदरात कोविड सेंटर  सुरू होणार आहे.

सध्याच्या भयावह परिस्थती कोविड रुग्णांना बेड मिळणे अवघड झाले आहे .अश्या परिस्थितीत हे कोविड सेंटर ४० बेड सर्वसामान्यांच्या सेवेत कणगर येथील हायस्कूल मध्ये सुरू करण्यात येत आहेत.  कोविड सेंटर सुरू करण्यासाठी शिवबा प्रतिष्ठाणचे अध्यक्ष तथा देवळाली प्रवरा नगरपालिकेचे नगरसेवक आदिनाथ कराळे,सिद्धार्थ कड,ओंकार सरोदे,बंटी शिंदे,विकास खोले,स्वप्नील बोरुडे, विलास काळे,सुशांत भोसले,रवी जाधव,आकाश ओहोळ,गणेश तांदळे,गोकुळ पावसे तसेच कणगर येथील सरपंच  सर्जेराव घाडगे,  अनिल घाडगे ,सुयोग नालकर , अनिल नालकर  तसेच सर्व शाळा व्यवस्थापन व ग्रामस्थांचे बहुमोल सहकार्य लाभले आहे.

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत