शिर्डी : वेबटीम शिर्डी मतदारसंघात जसे विखे कुटुंबाने हजारो रेमडेसिवर इंजेक्शन उपलब्ध केले व संपुर्ण राज्यात वा जिल्हात त्याचे वितरण केले,...
शिर्डी : वेबटीम
शिर्डी मतदारसंघात जसे विखे कुटुंबाने हजारो रेमडेसिवर इंजेक्शन उपलब्ध केले व संपुर्ण राज्यात वा जिल्हात त्याचे वितरण केले, असा गवगवा विखे कुटुंबाने सुरु केला असून, त्यांनी साईबाबाच्या कोव्हिड सेंटरवर स्वतःची थापटुन घेवु नये, असा टोमणा नगर जिल्हा काॅग्रेस सरचिटणीस श्री. श्रीकांत मापारी यांनी सोशल मीडियातून मारला आहे.
मापारी म्हणतात की, जे रेमडेसिवर इंजेक्शन साई संस्थान, प्रवरा मेडिकलला उपलब्ध झाले ते देखील शासनाच्या कोट्यातून झाले आहेत.मात्र फोटोत तेचं इंजेक्शन वर खाली करुन फोटो काढून आम्ही फार मोठा तीर मारला हे दाखवण्याचा विखे कुटुंबाने केविलवाणा प्रयत्न केला. मुळतः स्वतःच्या प्रवरा मेडिकल व नगर फौंडेशनला शासनाच्या कोट्यातून मिळालेले रेमडेसिवर इंजेक्शनचा एवढा मोठा गवगवा करणे म्हणजे स्वतः स्वतःची थापटुन घेणे या पेक्षा वेगळे काय? जर आपल्याला मतदारसंघातील गोरगरीब जनतेची ऐवढी काळजी होती तर तुम्ही त्याच्या आरोग्यासाठी किती बेडचे कोव्हिड सेंटर स्वतःच्या पैशातून उभे केले याचे उत्तर जनतेला द्यावे ? साईबाबाच्या कोव्हिड सेंटर वर स्वतःची थापटुन घेवु नये.
मागच्या वर्षे मोठ्या दिमाखात परपोकाराचा आव आणून लाॅकडाऊन मध्ये ठराविक गोरगरीब जनतेला आपण यादी करुन २ किलो तांदुळ, २ किलो गहु, आर्धा किलो साखर मोठा डांगबिरोबा करुन फ्लेक्स लावुन आपण वाटप केलेले गोरगरीब जनतेने पाहिले, मग तो किराणा गोरगरीबांना आजपर्यंत पुरला का ? वर्षांपासून गोरगरीब मेले की जिते यांची पर्वा पन्नास वर्षं सत्ता भोगणाऱ्या विखे कुटुंबाने केली का? असा सवाल देखील त्यांनी केला आहे. तेव्हा कोरोनाचे राजकारण करु नका, लोकांना सर्व ज्ञात आहे. ९० % लोक एनराॅड मोबाईल वापरतात, जगात काय चाललंय हे एका सेकंदात कळते अडाणी लोकांची संख्या आता नगन्न राहिली आहे. त्याचा गैरफायदा घेण्याचा काळ आता संपला. समाजात तरुणांची संख्या मोठी आहे व ती या शिर्डी मतदारसंघाची भविष्यातील परिवर्तनाची नादी आहे,असे संकेत त्यांनी स्पष्ठ केले

कोणत्याही टिप्पण्या नाहीत