कोपरगाव प्रतिनिधी कोपरगाव तालुक्यातील सर्व नागरिकांना जाहीर आवाहन करण्यात येते की, कोविड-१९ प्रतिबंध करणेकामी ब्रेक द चेन मिशन अंतर्गत सर...
कोपरगाव प्रतिनिधी
कोपरगाव तालुक्यातील सर्व नागरिकांना जाहीर आवाहन करण्यात येते की, कोविड-१९ प्रतिबंध करणेकामी ब्रेक द चेन मिशन अंतर्गत सर्व राज्यभर संचारबंदी लागू आहे. कोरोना रुग्णांची वाढत्या संख्यामुळे कोपरगाव शहरातील स्थानिक नागरिक व व्यापारी यांचे मागणीनुसार आज शुक्रवार दि.१६/०४/२०२१ रात्री ८.०० वा पासून ते सोमवार दि१९/०४/२०२१ सकाळी ७.०० वा पर्यंत जनता कर्फ्यु राहणार आहे. त्यानुसार शहरातील दवाखाने, मेडिकल,पाणी जार व दुध विक्री वगळता इतर सर्व व्यवसाय बंद राहतील.
तरी नागरिकांना सूचित करण्यात येते कि, आपण वर नमूद केलेल्या अत्यावश्यक कामा शिवाय घरा बाहेर पडू नये. नियमाचे उल्लंघन करणाऱ्या व्यक्तीवर दंडात्मक व कायदेशीर कारवाई करण्यात येईल. त्यामुळे सर्वांनी घरी रहा.... सुरक्षित रहा...
प्रशासनाने दिलेल्या सूचनांचे काटेकोरपणे पालन करून प्रशासनास सहकार्य करा. असे आवाहन पोलीस निरीक्षक वासुदेव देसले, मुख्याधिकारी प्रशांत सरोदे तहसीलदार योगेश चंद्रे यांनी कोपरगाव वासीयांना केले आहे.


कोणत्याही टिप्पण्या नाहीत