खुडसरगाव येथील पञकार कैलास देठे यांचे कोरोना निधन - आवाज जनतेचा

Page Nav

HIDE

Grid

GRID_STYLE

Classic Header

{fbt_classic_header}

News

latest

खुडसरगाव येथील पञकार कैलास देठे यांचे कोरोना निधन

वळण(प्रतिनिधी)     राहुरी तालुक्यातील खुडसरगाव येथील ४४ वर्षीय  पञकारांचे कोरोनाने निधन झाल्याने पञकारीता श्रेञात मोठी शोककळा पसरली आहे.खुडस...

वळण(प्रतिनिधी)

    राहुरी तालुक्यातील खुडसरगाव येथील ४४ वर्षीय  पञकारांचे कोरोनाने निधन झाल्याने पञकारीता श्रेञात मोठी शोककळा पसरली आहे.खुडसरगाव (ता.राहुरी) येथील पञकार कैलास देठे यांना पञकारीता करत असताना  कोरोनाची लागन झाली होती.पुढील उपचारासाठी त्यांना अहमदनगर येथील जिल्हा शासकीय  रूग्णालयात उपचारासाठी दाखल करण्यात आले होते.माञ उपचारादरम्यान गुरूवारी राञी त्यांची प्राणज्योत मालवली.त्यांच्या पश्चात वृद्ध आई,वडील, पत्नी, मुलगा, मुलगी, भाऊ,भावजयी,पुतने असा मोठा परीवार आहे.त्यांच्या अचानक झालेल्या निधनाने परीसरात हळहळ व्यक्त केली जात आहे.

 शुक्रवारी सायंकाळी सहा वाजता राहुरी शहरातील जेष्ठ नागरिक सभागृह प्रांगणात राहुरी तालुका पञकार संघाच्या वतीने शोकसभेचे आयोजक करण्यात आले होते. यावेळी जेष्ठ पञकार सुनिल भुजाडी, राजेंद्र वाडेकर,रमेश बोरूडे, प्रभाकर मकासरे, विनीत धसाळ,बाळकृष्ण वाघ,  राजेंद्र आढाव,गोविंद फुणगे, मनोज साळवे, संतोष जाधव,राजु पवार, बंडु म्हसे,आदिंसह तालुक्यातील पञकार उपस्थित होते.


           याप्रसंगी सुनिल भुजाडी, राजेंद्र वाडेकर, प्रभाकर मकासरे, विनीत धसाळ यांनी आपले मनोगत व्यक्त करताना सांगितले की,सध्या कोरोना चा महाभयंकर आजार सुरू आहे.दुसरीकडे माञ रूग्णालयात बेड उपलब्ध होत नाही,ऑक्सीजनसह उपचार व्यवस्थीत मिळत नाही. त्यामुळे समाजासाठी योगदान देणा-या पञकांरांची मोठी हेळसांड होत आहे.त्यामुळे राहुरी तालुक्यातील पञकार व त्यांच्या कुटुंबियांना तालुक्यातच प्राधन्याने सर्व समावेक्षक अल्प दरात उपचार सुविधा मिळाव्यात कारण सध्या सर्व समाजाला न्याय मिळवुन देणा-या पञकांरांना न्याय मिळत नसल्याची खंत पञकारांनी व्यक्त केली.त्यामुळे पञकारांना ह्या सर्व सोयी-सुविधा मिळाव्यात म्हणून लवकरच पञकारांचे शिष्टमंडळ आपत्ती व्यवस्थापन राज्यमंञी प्राजक्त तनपुरे तथा माजी मंञी शिवाजी कर्डिले, खासदार डाॅ. सुजय विखे,खासदार सदाशिव लोखंडे,आमदार लहु कानडे यांची भेट घेऊन निवेदनाव्दारे मागणी करणार असल्याचे सांगितले. त्याचप्रमाणे देठे कुटुंबियांना मदतीसाठी तालुका पञकार संघाच्या वतीने आर्थिक निधी संकलनाचा निर्णय घेण्यात आला.प्रसंगी सर्व पञकारांनी अधिस्विकृत्तीच्या जाचक अटी रद्द करून अधिकृत वृत्तपञ पञकारांना अधिस्विकृत्ती ग्राह धरून शासनाच्या योजनेचा लाभ मिळावा असा ठराव करण्यात आला.कारण अनेक वर्षांपासून पञकारीता करणा-या पञकाराला व त्यांच्या कुटुंबियांना कुठल्याही प्रकारची शासकीय मदत व सोसोयीसुविधा मदत मिळाली नसल्याने वंचित रहातात. 


 

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत