तालुकास्तरावर नोडल ऑफिसर नेमावे- अँड.नितीन पोळ - आवाज जनतेचा

Page Nav

HIDE

Grid

GRID_STYLE

Classic Header

{fbt_classic_header}

News

latest

तालुकास्तरावर नोडल ऑफिसर नेमावे- अँड.नितीन पोळ

कोपरगाव(वेबटीम) जिल्हाधिकारी यांनी आज आँक्सिजन व रेमडीसीवर औषधा बाबत तक्रारींचे निवारण करण्यासाठी नोडल ऑफिसरच्या नियुक्त्या केल्या अशाच नियु...

कोपरगाव(वेबटीम)

जिल्हाधिकारी यांनी आज आँक्सिजन व रेमडीसीवर औषधा बाबत तक्रारींचे निवारण करण्यासाठी नोडल ऑफिसरच्या नियुक्त्या केल्या अशाच नियुक्त्या तालुकास्तरावर देखील कराव्यात याव्यात अशी मागणी लोक स्वराज्य आंदोलनाच्या वतीने अँड.नितीन पोळ यांनी एका प्रसिद्धी पत्रकाद्वारे केली आहे.

आपल्या पत्रकात पोळ पुढे म्हणाले की अहमदनगर जिल्ह्यात रेमडीसीवर औषधें व आक्सिजनचा सर्रास काळा बाजार होत होता तशा अनेक तक्रारी समोर आल्या बेड व औषधाभावी अनेक पेशंट दगा वाले त्यामुळे नागरिकांमध्ये घबराट निर्माण झाली औषधांची वाढती मागणी व होणारा काळा बाजार यामुळे मा जिल्हाधिकारी यांनी आज स्वतंत्र आदेश काढून याबाबत च्या तक्रारींचे निवारण करण्यासाठी जिल्हा स्तरावर चोवीस तास सेवा देणारे नोडल ऑफिस सर च्या नेमणुका केल्या मात्र  हे अधिकारी जिल्ह्याच्या ठिकाणी आहेत तालुकास्तरावर देखील या बाबत खूप तक्रारी आहेत या तक्रारींचे निवारण करण्यासाठी प्रत्येक तालुक्यातील नागरिकांना जिल्ह्याच्या ठिकाणी नगर  येथे जाणे शक्य नाही तालुक्यातील नागरिक घरचे पेशंट पाहतील की तक्रारींचे निवारण व्हावे म्हणून जिल्ह्याला चकरा मारतील असा संभ्रम नागरिकांमध्ये निर्माण झाला आहे त्यामुळे जिल्हास्तराबरोबरच तालुका स्तरावर अशा नोडल अधिकाऱ्यांच्या नेमणुका झाल्या तर जलद व तत्काळ तक्रारींचे निवारण होऊ शकेल असे वाटते.

लोक स्वराज्य आंदोलनाच्या वतीने गेल्या काही दिवसांपूर्वी बेड व व्हेंटिलेटरची रोजची माहिती मिळावी अशी मागणी केली होती त्या करिता स्वतंत्र वेबसाईट सुरू केली तसेच रुग्णांना होणाऱ्या त्रासा बाबत तालूका स्तरावर वार रूम सुरू करावी अशी देखील मागणी केली होती मात्र आज जिल्हाधिकारी यांनी औषधे व बेड बाबत तक्रारींचे निवारण नोडल ऑफिसरच्या नियुक्त्या केल्या मात्र कोणत्या तालुक्यासाठी कोण अधिकारी नेमले याचा खुलासा होत नाही असे असले तरी जिल्हा स्तरा बरोबरच तालुकास्तरावर देखील अशा नोडल ऑफिसरच्या नियुक्त्या करण्यात याव्यात असे या पत्रकात म्हटले आहे.

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत