मुळा धरणातून डाव्या कालव्यातून शेतीसाठी आवर्तन सुरू - आवाज जनतेचा

Page Nav

HIDE

Grid

GRID_STYLE

Classic Header

{fbt_classic_header}

News

latest

मुळा धरणातून डाव्या कालव्यातून शेतीसाठी आवर्तन सुरू

राहूरी(वेबटीम )  दक्षिण अहमदनगर जिल्ह्याची जीवनदायिनी असलेल्या मुळा धरणातून  आज ( गुरुवार 15 एप्रिल ) धरणाच्या  डाव्या कालव्यातून  शेतीसाठी ...

राहूरी(वेबटीम)

 दक्षिण अहमदनगर जिल्ह्याची जीवनदायिनी असलेल्या मुळा धरणातून  आज ( गुरुवार 15 एप्रिल ) धरणाच्या  डाव्या कालव्यातून  शेतीसाठी दुसरे उन्हाळी  आवर्तन सोडण्यात  आले असल्याची माहिती  विकास गायकवाड यांनी  बोलताना दिली आहे.


 मुळा धरणाच्या  डाव्या कालव्यातून पहिल्या टप्प्यात  100 क्‍यूसेस आज सकाळी पाणी सोडण्यात आले. तर संध्याकाळी दुसऱ्या टप्यात100 क्युसेस पाणी सोडण्यात येणार आहे . 26 हजार दशलक्ष घनफूट पाणी साठवण क्षमता असलेल्या मुळा धरणात सध्या 15574दशलक्ष घनफूट पाणीसाठा आहे. त्यापैकी जिवंत पाणीसाठा11074दशलक्ष घनफूट आहे. तर उजवा कालवा 1225 क्‍युसेसने  पाणी सुरू आहे. सुमारे 30 हजार हेक्टर क्षेत्र ओलिताखाली आल्यानंतर उजवा कालवा बंद करण्यात येणार आहे.

          मुळा धरणाच्या डाव्या कालव्यातून पाणी सोडण्याचा निर्णय घेतल्यामुळे ऊस, कडवळ, मका,घास फळबाग इत्यादी  पिकांना  दिलासा मिळणार आहे.मुळा धरणाच्या डाव्या कालव्यातून आज ( गुरुवार 15 एप्रिल) सकाळी पाणी सोडण्यात  आले आहे. साधारण कालवा 25 दिवस सुरू राहणार आहे .पाणी सोडल्यामुळे सुमारे तीन हजार हेक्टर क्षेत्र ओलिताखाली येणार आहे.

   विकास गायकवाड ,सिंचन शाखा अभियंता, मुळा डावा कालवा

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत