संगमनेर : प्रतिनिधी तालुक्यातील आश्वी बु ॥ येथे दोन गटामध्ये किरकोळ कारणामुळे मारामारी झाली असुन दोन्ही गटाने एकमेकां...
संगमनेर : प्रतिनिधी
तालुक्यातील आश्वी बु ॥ येथे दोन गटामध्ये किरकोळ कारणामुळे मारामारी झाली असुन दोन्ही गटाने एकमेकांच्या विरोधात आश्वी बु पोलिस स्टेशन मध्ये फिर्याद दिली आहे. कोरोना व्हायरसचा वाढता प्रादुर्भाव रोखण्यासाठी महाराष्ट्रात कलम १४४ लागु आहे असे असताना आश्वी बु येथे दोन गटा मधिल झालेल्या मारामारीमुळे खळबळ उडाली आहे.
सविस्तर माहीती अशी की, राहुल शहादेव घुटे वय २२ वर्ष रा. आश्वी बु यांस काही कारण नसताना आरोपी नं १ शुभम संजय गाडेकर, नं २. अजय गंगाधर शेंडे रा आश्वी बु ता. संगमनेर यांनी दि २९ एप्रिल रोजी दु ४ वा. महादेव मंदीरा जवळ, आश्वी बु ता संगमनेर आरोपि नं १ व नं २ याने संगणमत करून दोरीच्या साह्याने बांधुन मारहान केली व जीवे मारण्याची धमकी देऊन शिवीगाळ केली तसेच आरोपि नं २ याने फिर्यादीचा मुलगा राहुल यांच्या डाव्या हाताच्या मधल्या बोटाला चावe घेतला व त्यास जखमी केले. फिर्यादी नंदा शहादेव घुटे वय ४४ वर्ष धंदा घरकाम यांनी दिलेल्या फिर्यादी नुसार गुन्हा रजि. नं ५६ / २०२१ भा.द.वि कलम ३२४, ३२३, ५०४, ५०६, ३४ प्रमाणे गुन्हा दाखल झाला.
फिर्यादी शुभम सजंय गाडेकर वय २५ वर्ष धंदा खाजगी नौकरी यांने आरोपी १. विजय़ खेमनर (पुर्ण नाव माहित नाही) रा ओझर, २. बंटी साहेबराव मदने, ३. लखन साहेबराव मदने, ४. राहुल शहादेव घुटे सर्व राहणार आश्वी बु तसेच इतर दोन अनओळखी इसम यांनी दि २९ एप्रिल रोजी सायंकाळी ६ वा ३०मि ते ७ वाचे दरम्यान फिर्यादीच्या राहात्या घरात घुसुन दुपारी झालेल्या भांडण्याचा राग मनात धरून आरोपि नं १ यांने घराजवळील पडलेली विट हाता मध्ये घेऊन फिर्यादीच्या घरात घुसुन डावे कानाखाली मारली


कोणत्याही टिप्पण्या नाहीत