जिल्ह्यात १४ दिवस जनता कर्फ्यु, अत्यावश्यक सेवा ठराविक वेळेत सुरू राहणार - आवाज जनतेचा

Page Nav

HIDE

Grid

GRID_STYLE

Classic Header

{fbt_classic_header}

News

latest

जिल्ह्यात १४ दिवस जनता कर्फ्यु, अत्यावश्यक सेवा ठराविक वेळेत सुरू राहणार

  अहमदनगर(वेबटीम) पालकमंत्री हसन मुश्रीफ यांनी आजपासून नगर जिल्ह्यात १४ दिवस(३० एप्रिल पर्यंत) जनता कर्फ्यु लागू करण्याचा आदेश दिल्यानंतर जि...

 अहमदनगर(वेबटीम)

पालकमंत्री हसन मुश्रीफ यांनी आजपासून नगर जिल्ह्यात १४ दिवस(३० एप्रिल पर्यंत) जनता कर्फ्यु लागू करण्याचा आदेश दिल्यानंतर जिल्हाधिकारी डॉ.राजेंद्र भोसले यांनी रात्री उशिरा नवीन आदेश काढला असून जिल्ह्यात आता अत्यावश्यक सेवा  ठराविक वेळेत सुरू राहणार आहेत. तर पेट्रोल व डिझेल पंपावर खासगी वाहनांना सकाळी ७ ते ११ या वेळेतच पेट्रोल  डिझेल मिळणार आहे. तर सार्वजनिक सेवेतील वाहने व मालवाहतूक करणारी खासगी वाहने यांना मात्र नियमित वेळेनुसार फक्त डिझेल विक्री करण्याची परवानगी देण्यात आली आहे. 

किराणा दुकान, भाजीपाला(द्वार वितरण), फळे विक्री(द्वार वितरण), कृषी संबधी सर्व सेवा दुकाने,  पशुखाद्य विक्री, अंडी, मटण, मासे विक्री इतर अत्यावश्यक सेवेसाठी सकाळी ७ ते ११ कालावधीत सुरू ठेवण्याचा आदेश देण्यात आला आहे

*जिल्हाधिकारी यांचा आदेश खालीलप्रमाणे*



*जिल्ह्यातील हॉटेल, रेस्टॉरंट, बियर बार बंद राहतील. मात्र त्यांना घरपोहोच सेवा देण्याची परवानगी

*धार्मिक स्थळे, आठवडे बाजार, भाजीपाल्याचे बाजार व दारू दुकाने पूर्णतः बंद राहणार 

*टॅक्सी, रिक्षा या द्वारे फक्त अत्यावश्यक सेवांं करिता वाहतूक करता येणार 

*चारचाकी खासगी वाहने फक्त अत्यावश्यक कारणांसाठीच वापरता येणार 

 *सर्व खासगी कार्यालय पूर्णतः बंद राहणार

*१ मे पर्यंत कोणत्याही लग्न सोहळ्याला परवानगी मिळणार नाही. 

*खासगी बांधकामे, सेतू कार्यालय, आधार कार्यालय, व्यायाम शाळा, स्विमिंग पूल, मॉर्निंग वॉक करण्याची ठिकाणे, तसेच बेकरी व मिठाईची दुकाने पूर्णता बंद राहणार 


कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत