राहूरी(वेबटीम) राहूरी तालुक्यात आज शनिवार दि १७ एप्रिल कोरोना रूग्ण संख्येने उच्चांक गाठला असून दिवसभरात एकूण १८६ कोरोना बाधित रूग्ण आढळून...
राहूरी(वेबटीम)
राहूरी तालुक्यात आज शनिवार दि १७ एप्रिल कोरोना रूग्ण संख्येने उच्चांक गाठला असून दिवसभरात एकूण १८६ कोरोना बाधित रूग्ण आढळून आले आहेत.
देवळाली प्रवरा शहरात आज एकूण ९ तर राहूरी फॅक्टरी येथे ८ कोरोना रूग्ण आढळून आले आहेत. तालुक्यात दिवसेंदिवस कोरोना रूग्ण वाढत असल्याने नागरीकांनी संचारबंदी आदेशाचे काटेकोरपणे पालन करून कोरोनाला रोखण्यासाठी काळजी घेणे आवश्यक असल्याचे आवाहन तहसीलदार एफ.आर.शेख यांनी केले आहे.
*राहुरी तालुका कोव्हीड आजअखेर स्थिती*
राहूरी तालुक्यात आजअखेर एकुण केसेस ५३२८ रूग्ण आढळून आले असून उपचार पुर्ण होऊन ४२६५ घरी परतले आहे. सध्या ९८३ रुग्णांवर उपचार सुरु असून आज अखेर ८० व्यक्तींचा कोरोनामुळे मृत्यू झाला आहे.विद्यापीठ कोविड केअर सेंटर येथे ३४७ तर वांबोरी ग्रामीण रुग्णालय २४ रूग्ण उपचार घेत आहेत.


कोणत्याही टिप्पण्या नाहीत