वळण (प्रतिनिधी) भारतीय राज्य घटनेचे शिल्पकार भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांची १३० वी जयंती वळण येथे मोठ्या उत्साहात कोरोनाचे नियम पाळू...
वळण (प्रतिनिधी)
भारतीय राज्य घटनेचे शिल्पकार भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांची १३० वी जयंती वळण येथे मोठ्या उत्साहात कोरोनाचे नियम पाळून साजरी करण्यात आली. प्रसंगी आंबेडकर चौकात नव्याने उभारण्यात आलेल्या ध्वज-स्मारकाचे लोकार्पण देखील करण्यात आले.
वळण(ता.राहुरी) येथील तरूणांनी एकञ येत चोकात भीम स्मारक उभरले आज जयंती निमीत्त या ठिकाणी प्रमुख मान्यवरांच्या उपस्थित फित कापुन महापुरूषांच्या प्रतिमेस पुष्पहार अर्पण करून आंबेडकरांचा जयघोष करण्यात आला.प्रसंगी स्थानिक गुन्हे शाखेचे पो.काॅ. मनोज गोसावी, उपसरपंच एकनाथ खुळे, पञकार प्रभाकर मकासरे,रासपाचे जिल्हा अध्यक्ष नानासाहेब जुंधारे,अशोक कुलट, मनोज मकासरे ,धनंजय आढाव यांनी आपले मनोगत व्यक्त केले.
यावेळी सरपंच सुरेश मकासरे, ज्ञानेश्वर खुळे, राजू मकासरे,संभाजी ब्रिगेडचे जिल्हा अध्यक्ष मच्छिंद्र गुंड, महासचिव राजेंद्र खोजे ,पत्रकार शरद पाचरणे,डाॅ. रमेश गायकवाड, संजय संसारे ,संतोष वाघमारे ,सिताराम गोसावी,धनंजय आढाव, बाळासाहेब शिंदे, प्रकाश मकासरे फकीरचंद फुगणे , गोपीनाथ खुळे, प्रकाश खुळे ,रवी गोसावी, एकनाथ कर्डिले ,डॉ. किशोर म्हस्के, कैलास गोसावी, विलास गोलवड,आदि उपस्थित होते.जयंती उत्सव साजरा करण्यासाठी देवानंद मकासरे ,दयानंद मकासरे,सोन्याबापु मकासरे, बळीराम दरंदले ,ऋषी मकासरे ,संदीप रणसिंग, संदीप मकासरे आदीसह मकासरे युवक मंडळाने परिश्रम घेतले.




कोणत्याही टिप्पण्या नाहीत