देवळाली प्रवरा प्रतिनिधी गेल्या वर्षभरापासून कोरोना रोगाने अक्षरश: थैमान घातले असून कोरोनाची लागण झाल्याने देवळाली प्रवरा येथील ...
देवळाली प्रवरा प्रतिनिधी
कोरोनाचा पहिला बळी राहूरी तालुक्यातील देवळाली प्रवरातील पशुवैद्यकीय डॉक्टरचा झाला आहे. गेल्या दोन आठवड्यात कोरानाने 7 व्यक्तींवर घाला घातला आहे.राहुरी तालुक्यात आज अखेर ४ हजार पेक्षा जास्त रुग्ण कोरोना बाधित निघाले आहेत. सध्य स्थितीला राहूरी तालुक्यातील 571 रुग्णांवर उपचार सुरू आहेत.कृषी विद्यपीठात 164 रूग्ण कोरंटाईन असून अन्य रूग्ण खासगी रुग्णालय व कोविड सेंटरला उपचार घेत आहेत.
कोरोना वाढीला सर्व नागरिक जबाबदार आहेत.गर्दी टाळण्याचे प्रशासन घसा तोडून सांगत असतानाही लग्न समारंभास 50 व्यक्तींना परवानगी असतानाही हजार पाचशे व्यक्ती लग्नकार्यात उपस्थित दिसत आहे. प्रशासनाला उघड्या डोळ्याने दिसुनही स्थानिक राजकीय संबधामुळे कारवाई करण्याचे टाळले जाते. या ठिकाणाहुन कोरोना फैलाव होत असला तरी नागरिकांचे डोळे उघडत नाही. कोरोनाचा फैलाव सध्या शहरा पेक्षा ग्रामिण भागात अधिक वाढला आहे. त्यातच खाजगी प्रयोगशाळेत कोरानाची तपासणी केली जात असुन ठराविक रकमेसाठी अनेक कोरोना बाधितांची नावे प्रशासना पर्यंत दिली जात नाही.त्यामुळे प्रशासनही अंधारात राहत आहे.परंतू हेच बाधित रुग्ण बाजारपेठेत खुलेआम फिरुन मिञांसमवेत चहापानी घेताना दिसतात. आणि जवळच्याच मिञांना कोरोनाचा वानुळा दिला जात आहे.कोरोना फैलाव करण्यात सुपर स्प्रेडर ठरत आहे.
राहुरी तालुक्यात सध्या कोविड सेंटर मध्ये लाखो रुपये उपचासाठी खर्च करण्या ऐवजी फँमिली डाँक्टर मार्फत उपचार करुन घेतले जात आहे.त्यामध्ये देवळाली प्रवरा व राहूरी फॅक्टरीत येथील अनेक डॉक्टर कोरोना बाधितांना घरी ठेवून उपचार करत आहे. त्यामुळे घरी राहून रूग्ण बेफिकीर पणे वागून खुलेआम फिरताना पहावयास मिळत आहे. परिणामी अनेक बाधीत रुग्णांपासून घरातील सदस्य व इतराना कोरोनाची लागण होत आहे. देवळाली प्रवरा व राहूरी फॅक्टरी परिसरातील खासगी डॉक्टर कोरोनावर उपचार करत असेल तर त्यांच्यावर निश्चित कारवाई केली जाईल असा इशारा तालुका आरोग्य अधिकारी डाँ. दिपाली गायकवाड यांनी दिला आहे.


कोणत्याही टिप्पण्या नाहीत