नगर जिल्ह्यातील उपलब्ध बेडची माहिती आता एका फोन कॉलवर - आवाज जनतेचा

Page Nav

HIDE

Grid

GRID_STYLE

Classic Header

{fbt_classic_header}

News

latest

नगर जिल्ह्यातील उपलब्ध बेडची माहिती आता एका फोन कॉलवर

  अहमदनगर(वेबटीम)  जिल्ह्यातील अनेक रुग्णांना बेड मिळेल का नाही, याची चिंता लागून राहीली आहे. बेड न मिळण्याच्या भितीने उपचारही घेतले जात नाह...

 अहमदनगर(वेबटीम)

 जिल्ह्यातील अनेक रुग्णांना बेड मिळेल का नाही, याची चिंता लागून राहीली आहे. बेड न मिळण्याच्या भितीने उपचारही घेतले जात नाहीत. मात्र जिल्हा प्रशासनाने जिल्ह्यातील विविध शासकीय व खाजगी रुग्णालयांमध्ये उपलब्ध बेडची माहिती नागरिकांना उपलब्ध करुन देण्यासाठी 24x7 नियंत्रण कक्ष (कंट्रोल रूम) कार्यान्वित करण्यात आला आहे. यामुळे नागरिकांना खाजगी व शासकीय रुग्णांलयातील बेडची माहिती एका फोन कॉलवर मिळणार आहे.

जिल्हाधिकारी डॉ. राजेन्द्र भोसले यांच्या निर्देशानुसार हा नियंत्रण कक्ष कार्यान्वित करण्यात आला असून त्याचा दूरध्वनी क्रमांक 0241-2345460 असा आहे. या कंट्रोल रुमसाठी नोडल अधिकारी म्हणून उपजिल्हाधिकारी (महसूल) श्रीमती उर्मिला पाटील यांची तर सहाय्यक अधिकारी म्हणून जिल्हा सूचना विज्ञान अधिकारी गजानन नकासकर यांची नियुक्ती करण्यात आली आहे, अशी माहिती निवासी उपजिल्हाधिकारी संदीप निचित यांनी दिली आहे.

नागरीकांनी जिल्ह्यातील विविध शासकीय व खाजगी रुग्णालयांमध्ये उपलब्ध बेडची माहिती मिळणेकरीता सदर नियंत्रण कक्षाशी (कंट्रोल रुमशी) संपर्क साधावा. सदर कंट्रोल रुम 24x7 सुरु राहील, असे कळविण्यात आले आहे.

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत