संगमनेर : प्रतिनिधी संगमनेर तालुक्यातील कोल्हेवाडी येथे रविवारी पहाटे चार वाजेच्या सुमारासतीन बिबट्याच्या बछड्यानी हल्ला करून दोन शेळ्या ...
संगमनेर : प्रतिनिधी
संगमनेर तालुक्यातील कोल्हेवाडी येथे रविवारी पहाटे चार वाजेच्या सुमारासतीन बिबट्याच्या बछड्यानी हल्ला करून दोन शेळ्या ठार केल्या तर एक शेळी गंभीर रित्या जखमी केली .
संगमनेर तालुक्यातील कोल्हेवाडी येथील करपट वस्तीवर राहणारे अरुण पांडुरंग वामन या शेतकऱ्याच्या वस्तीवर गोठ्यात शेळ्या बांधलेल्या होत्या. गोठया ला लोखंडी जाळीने पॅक केलेले होते, पहाटे चार वाजेच्या सुमारास अचानक तीन बिबट्यांच्या बछड्यांनी लोखंडी जाळी वर करून आतमध्ये प्रवेश केला आणि दोन शेळ्यांना चावा घेऊन जागीच ठार केले तर एक शेळी गंभीर जखमी केले.
बिबट्याचे बछडे आल्यामुळे गोठ्यातील बैलांनी आरडाओरडा करण्यास सुरुवात केली, हे ऐकताच वामन यांच्या घरातील माणसे घराबाहेर आली आणि त्यांनी मोठमोठ्याने आरडाओरडा केल्यानंतर ही तीनही बिबट्यांची बछडे पळून गेले आणि शंभर ते दोनशे फुटावर जाऊन उभे राहीले. तरी या परिसरामध्ये बिबट्यांच्या बछड्यांची संख्या जास्त असल्यामुळे वनविभागाने या परिसरात त्वरित पिंजरा लावावा, अशी मागणी वामन यांनी केली आहे


कोणत्याही टिप्पण्या नाहीत