राहुरी विद्यापीठ : प्रतिनिधी महात्मा फुले कृषी विद्यापीठातील हवामान अद्ययावत शेती व जलव्यवस्थापनाचे आधुनिक कृषी विज्ञान तंत्रज्ञान प्रकल्प...
राहुरी विद्यापीठ : प्रतिनिधी
महात्मा फुले कृषी विद्यापीठातील हवामान अद्ययावत शेती व जलव्यवस्थापनाचे आधुनिक कृषी विज्ञान तंत्रज्ञान प्रकल्पांतर्गत फळे व भाजीपाला पिकांचे काढणीत्तोर व्यवस्थापन या विषयावरील तीन आठवड्याचा ऑनलाईन प्रमाणपत्र अभ्यासक्रम संपन्न झाला.या वेळी कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी महात्मा फुले कृषि विद्यापीठाचे कुलगुरू डॉ. पी. जी. पाटील उपस्थित होते. या प्रसंगी कार्यक्रमासाठी प्रमुख पाहुणे म्हणून डॉ. ए. के. सिंग, उप-महासंचालक, फलोत्पादन, भारतीय कृषि अनुसंधान परिषद, नवी दिल्ली हे उपस्थित होते. प्रमुख मार्गदर्शन करताना डॉ.ए. के.सिंग म्हणाले की शेतकऱ्यांचे उत्पन्न वाढवायचे असेलतर कृषि विद्यापीठांनी विकशित केलेले नवनवीन तंत्रज्ञान शेतकऱ्याच्या बांधावर पोहोचणे गरजेचे आहे. शेतकऱ्याच्या शेतावर तयार झालेला माल काही कारणास्तव बाजारात पोहोचेपर्यंत उशीर होतो त्यासाठी शेतकऱ्यांना त्यांच्या स्वतःच्या मालाचे काढणीपश्चात तंत्रज्ञान, प्रक्रिया आणि विपणन याविषयी जागृती करण्याची गरज आहे. त्याचबरोबर फळे व भाजीपाल्यापासून जास्तीत जास्त प्रक्रियायुक्त पदार्थ उत्पादन करून त्यांची निर्यात वाढवून परकीय चलन मिळविण्यासाठी वाव आहे. त्यामुळे शेतमाल प्रक्रिया उद्योगांना चालना मिळेल व त्यापासून मोठ्या प्रमाणावर रोजगार निर्मिती होणे शक्य असल्याचे प्रतिपादन त्यांनी केले. या प्रसंगी कुलगुरू डॉ. पी. जी. पाटील म्हणाले प्रशिक्षणाचा लाभ घेऊन प्रशिक्षणार्थींनी कृषि उद्योजक होऊन, प्रक्रिया व विपणन या क्षेत्रामध्ये काम करण्याची गरज आहे. यावेळी प्रमुख उपस्थिती मध्ये डॉ. आर. टी. पाटील, माजी संचालक सीफेट, लुधियाना, डॉ. नचिकेत कोटवालीवाले, संचालक सीफेट, लुधियाना, डॉ. दिलीप पवार, सहयोगी अधिष्ठाता, डॉ. अण्णासाहेब शिंदे कृषि अभियांत्रिकी महाविद्यालय, म.फु.कृ.वि., राहुरी, तसेच प्रकल्पाचे प्रमुख संशोधक आणि या प्रशिक्षणाचे निमंत्रक डॉ. सुनील गोरंटीवार हे होते,विविध विभागांचे विभाग प्रमुख उपस्थित होते.
या प्रशिक्षणाला संपूर्ण भारतातून ११४ प्रशिक्षणार्थी सहभागी झाले होते. या तीन आठवड्याच्या ऑनलाईन प्रमाणपत्र प्रशिक्षण फळे व भाजीपाला काढणीत्तोर व्यवस्थापन, हाताळणी, प्रक्रिया व विपणन या क्षेत्रातील वेगवेगळे नामवंत प्रशिक्षक लाभले होते. प्रशिक्षणाचे आयोजक डॉ. विक्रम कड, सहयोगी प्राध्यापक, कृषि प्रक्रिया अभीयांत्रिकी, म.फु.कृ.वि, राहुरी हे होते. प्रकल्पाचे सह-समन्वयक आणि या प्रशिक्षणाचे सह-निमंत्रक, डॉ. मुकुंद शिंदे, यांनी कार्यक्रमाचे आभार मानले. या ऑनलाईन प्रशिक्षणाचे समन्वयक म्हणून डॉ. मंगेश बाविस्कर, डॉ. नंदलाल देशमुख आणि इ. मोसीन तांबोळी यांनी काम पहिले.


कोणत्याही टिप्पण्या नाहीत