वळण येथे पत्रकार अशोक तुपे व कैलास देठे यांना श्रद्धांजली - आवाज जनतेचा

Page Nav

HIDE

Grid

GRID_STYLE

Classic Header

{fbt_classic_header}

News

latest

वळण येथे पत्रकार अशोक तुपे व कैलास देठे यांना श्रद्धांजली

राहूरी/प्रतिनिधी        श्रीरामपुर तालुक्यातील जेष्ठ पञकार अशोक तुपे आणि राहुरी तालुक्यातील खुडसरगांव येथील पञकार कैलास देठे यांचे अल्पशा आज...

राहूरी/प्रतिनिधी 

      श्रीरामपुर तालुक्यातील जेष्ठ पञकार अशोक तुपे आणि राहुरी तालुक्यातील खुडसरगांव येथील पञकार कैलास देठे यांचे अल्पशा आजाराने निधन झाले आहे.त्यामुळे पञकार क्षेञात मोठी शोककळा पसरली आहे. 

      गुरुवारी वळण (ता.राहुरी) येथील हनुमान मंदिरासमोर या दिवंगत पञकारांना श्रद्धांजली अर्पण करण्यात आली.यावेळी त्यांच्या आठवणींना उजाळा देत या दु:खातुन त्यांच्या कुटुंबियांना सावरण्याची शक्ती देवो अशी ईश्वरचरणी प्रार्थना करण्यात आली.

यावेळी ग्रामपंचायतीचे जेष्ठ सदस्य अशोक कुलट,मा.सरपंच सुदाम शेळके,पोलिस पाटील सोमनाथ डमाळे,फकिरचंद फुणगे, सामाजिक कार्यकर्ते धनंजय आढाव, मा.चेअरमन प्रकाश आढाव,पञकार प्रभाकर मकासरे, वसंत आढाव, गोविंद फुणगे,ॠषी आढाव, दत्ताञय पारे आदी उपस्थित होते.

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत