अकोले : प्रतिनिधी कोरोनाच्या ह्या दिवसेंदिवस गंभीर होणाऱ्या परिस्थितीमध्ये ऑक्सिजन बेड्स, व्हेंटिलेटर ,प्लाझ्मा ,रक्त,औषधे यांचा...
अकोले : प्रतिनिधी
कोरोनाच्या ह्या दिवसेंदिवस गंभीर होणाऱ्या परिस्थितीमध्ये ऑक्सिजन बेड्स, व्हेंटिलेटर ,प्लाझ्मा ,रक्त,औषधे यांचा तुटवडा जाणवत आहे. अशा गरजू रुग्णांना आणि त्यांच्या कुटुंबीयांना मदत करण्यासाठी तरुणाई पुढे सरसावली आहे.
कोरोना झालेल्या एका मित्राला प्लाझ्माची गरज असताना फेसबुकच्या माध्यमातून तो त्वरित उपलब्ध झाला . त्यावेळी या सर्वांनी विचार केला की अशा किती जणांना दररोज मदतीची गरज असेल आणि ह्याच गोष्टीतून प्रेरणा घेत हा ग्रुप कार्यरत करण्यात आला.
रुग्ण त्यांना हवी असलेली मदत अहमदनगर कोरोना गृप वर टाकतात व त्यांना अगदी काही मिनिटांत मदत मिळवून देण्यासाठी सोशल मीडियाचा प्रभावी वापर केला जातो. रेमडीसीविरचा तुटवडा असताना जिथं जिथं शक्य असेल तिथं ही तरुणाई जाऊन पोहचली आणि मदतीचे हात पुढे केले.
सुरुवातीला फक्त अकोले-संगमनेर मधील रुग्णांचे मदतीसाठी फोन येत होते.नंतर संपूर्ण अहमदनगर हे मदतीचे जाळे पसरले आणि त्यासोबतच पुणे नाशिक सारख्या शहरांमध्ये पण मदत कार्य चालू करण्यात आले. "सावली फाऊंडेशन"च्या सायली धनाबाई ह्या नेहमीच सर्वांच्या ऊर्जास्त्रोत राहिल्या आहेत, प्लाझ्मा दानासाठी सर्वतोपरी मदतीसाठीची प्रेरणा त्यांच्याकडूनच सर्वांना मिळत आहे.
नगर जिल्हा वगळता इतर सर्वांना तत्पर मदत करण्यात थोड्या अडचणी येत असल्या तरी मदतकार्य युद्ध पातळीवर सुरू आहे. आज पर्यंत या ग्रुप मार्फत 45 प्लाझ्मा, 82 बेड , 35 ऑक्सिजन बेड,37 व्हेंटिलेटर बेड मिळून देण्यात आले आहेत त्यासोबतच गोळ्या व औषधे ही उपलब्ध करून देण्यात आले आहे.
"सध्या प्लाझ्माचा प्रचंड तुटवडा जाणवत असून बरे झालेल्या रुग्णांनी पुढे यावे व कुणाचा तरी जीव वाचविण्यास हातभार लावावा. देशसेवा ही फक्त वर्दी घालूनच किंवा रक्त सांडूनच करता येते असे नाही तर रक्त दान करून देखील आपण देशसेवेत हातभार लावत आहात" असे आव्हान देवेंद्र आभाळे यांनी केले.
"आम्ही माध्यमांचा वापर करून एक नेटवर्क तयार केले आहे,गूगल फॉर्म तयार करून जे दाते आहेत त्यांच्याकडून स्वतःचे नाव, पत्ता ,वय ,रक्तगट व संपर्क असा फॉर्म भरून घेतला जातो,असे 400 पेक्षा जास्त दात्यांची माहिती आमच्याकडे जमा झालेली आहेत .त्यासोबत अनेक रुग्णालयांमध्ये आम्ही प्लाझ्मा दान करावा व लागल्यास संपर्क करावा असे आव्हान करणारे फलक चिटकवून आलो आहे.आपणास देखील गरज असल्यास 9765695734 या क्रमांकावर संपर्क करावा"
-डॉ .पूर्वीता वाकचौरे
प्लाझ्मा सोबतच रक्तदान सुद्धा गरजेचं आहे राज्यात सध्या रक्ताचा तुटवडा आहे या मुळे राज्यभरात रक्तदान शिबिर आयोजित करणे गरजेचे आहे.याची सुरुवात अकोले तालुक्यातून होत असून येत्या 1 मे महाराष्ट्र दिनी अकोल्यात रक्तदान शिबिराचे आयोजन करण्यात येणार आहे. तरी जास्तीत जास्त रक्तदात्यांनी या शिबिरात रक्तदान करावे. या गृप मध्ये देवेंद्र आभाळे, श्रेयस भांगरे,पूर्वीता वाकचौरे,आसिया शेख,शुभम जाधव ,शिवराज भोर,राहुल जाधव,आदर्श उघडे आदी हिरीरीने कार्य करत आहेत. ---------- "
पाॅझिटीव्ह रक्त गट असणाऱ्याला निगेटिव्ह रक्त गटाचा प्लाझ्मा चालतो पण पाॅझिटीव्हला पाॅझिटीव्ह प्लाझ्मा मिळाला तर रुग्ण लवकरात लवकर बरा होतो.म्हणून डॉक्टर शक्यतो समान रक्तगटाला महत्व देतात रुग्ण लवकरात लवकर बरा व्हावा हे त्यामागचं कारण असत. प्लाझ्मा दान केल्याने दात्याच्या शरीरावर कुठल्याच प्रकारचा परिणाम होत नाही व त्याचा काही त्रासही होत नाही, मी स्वतः प्लाझ्मादान केले आहे. उलट काही दिवसात पुन्हा आपल्या शरीरात antibodies तयार होतात आणि गरजूचा जीव देखील वाचतो" : श्रेयस भांगरे
"आजची परिस्थिती फार वाईट आहे,एकमेकांना साहाय्य करणं काळाची गरज आहे तरच भविष्य सुखकर होईल. कोरोनातून बरे होऊन 28 दिवस झाल्यानंतर प्लाझ्मा देता येतो ,तुमचा एक प्लाझ्मा 2 जणांचा जीव वाचवू शकतो. त्याबरोबरच आम्ही सर्व जनतेला Vaccine घेण्याआधी रक्तदान करण्याचे आव्हान करतो आहोत." : रोहित बर्वे


कोणत्याही टिप्पण्या नाहीत