कोपरगाव पोलिसांकडून कोविड सेंटरच्या ऑक्सिजन संचाची पाहणी - आवाज जनतेचा

Page Nav

HIDE

Grid

GRID_STYLE

Classic Header

{fbt_classic_header}

News

latest

कोपरगाव पोलिसांकडून कोविड सेंटरच्या ऑक्सिजन संचाची पाहणी

  कोपरगाव/प्रतिनिधी नाशिक महानगरपालिकेच्या रुग्णालयात तब्बल २९ रुग्णांचा प्राणवायू गळतीमुळे दुर्दैवी मृत्यू झाला आहे. आधीच ऑक्सिजन मिळ...

 कोपरगाव/प्रतिनिधी

नाशिक महानगरपालिकेच्या रुग्णालयात तब्बल २९ रुग्णांचा प्राणवायू गळतीमुळे दुर्दैवी मृत्यू झाला आहे. आधीच ऑक्सिजन मिळवण्यासाठी शासन व प्रशासनाची अक्षरशः दमछाक होत आहे; त्यामुळे कोणताही अनुचित प्रकार घडू नये यासाठी कोपरगाव शहर पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक वासुदेव देसले यांनी गुरुवारी (ता.२२) पावणे चार वाजेच्या सुमारास कोविड सेंटरला भेट देऊन प्राणवायू संचाची पाहणी करत खबरदारीच्या सूचना दिल्या आहेत.

नाशिक येथील दुर्दैवी घटनेने राज्यासह संपूर्ण देश शोकसागरात बुडाला आहे. ऑक्सिजनच्या टाकीत वायू भरत असताना गळती लागली. यामध्ये कोरोनाबधित रुग्ण उपचार घेत असताना त्यांना पुरविण्यात येणार प्राणवायूचा पुरवठा खंडित झाला. यामध्ये तब्बल २९ रुग्णांना मृत्यूला मुकावे लागले. या दुर्दैवी घटनेबद्दल राज्यासह संपूर्ण देशभरातून प्रतिक्रिया उमटल्या आणि हळहळ व्यक्त केली. या पार्श्वभूमीवर कोपरगाव शहर पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक वासुदेव देसले यांनी गुरुवारी आत्मा मालिक कोविड रुग्णालय आणि कोकमठाण येथील श्री जनार्दन स्वामी कोविड रुग्णालयास भेट देत ऑक्सिजन संचाची पाहणी करून कोणताही अनुचित प्रकार घडू नये याबाबत आवश्यक त्या खबरदारीच्या सूचना दिल्या. यावेळी दोन्ही रुग्णालयांतील डॉक्टर व कर्मचारी उपस्थित होते.

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत