राहूरी फॅक्टरी(वेबटीम) राहूरी तालुक्यात दिवसेंदिवस कोरोना रुग्णसंख्या दिवसेंदिवस झपाट्याने वाढत असून देवळाली प्रवरा व राहूरी फॅक्टरी परिसरात...
राहूरी फॅक्टरी(वेबटीम)
राहूरी तालुक्यात दिवसेंदिवस कोरोना रुग्णसंख्या दिवसेंदिवस झपाट्याने वाढत असून देवळाली प्रवरा व राहूरी फॅक्टरी परिसरात कोरोनाने कहर केला असून गेल्या दोन दिवसात देवळाली प्रवरात २५ तर राहूरी फॅक्टरी येथे ७ कोरोना असे एकूण ३२ कोरोना बाधीत रूग्ण आढळून आले आहेत.
राहूरी तालुक्यात दररोज मोठ्या प्रमाणात कोरोना रूग्ण सँख्या वाढत आहे. तालुक्यातील सर्व कोविड सेंटर हाऊस फुल झाल्याने रुग्णांना अन्य तालुक्यात उपचारासाठी जावे लागत आहे. रॅमडेसिवर इंजक्शन मिळत नसल्याने रुग्णांची फरफड होत आहे.
देवळाली प्रवरात गेल्या दोन दिवसात २५ कोरोना रूग्ण आढळून आले असून यामध्ये १० पुरुष तर १५ महिलांचा समावेश आहे. तर राहूरी फॅक्टरीत ४ पुरुष तर ३ महिला याप्रमाणे एकूण ७ कोरोनाबाधीत रूग्ण आढळून आले आहेत.
देवळाली प्रवरा व राहूरी फॅक्टरी परिसरात जनता कर्फ्यु असतानाही अनेक नागरिक विनाकारण फिरत असतात. देवळाली प्रवरा शहरात गल्लोगल्ली नागरिक विनामास्क नागरिकांचे टोळके बघायला मिळते. अनेक दुकाने छुप्या मार्गाने सुरू असतात मात्र पालिका प्रशासन अथवा पोलीस कुठलेही कारवाई करताना दिसत नाही. पोलीस गावात फेरफटका मारायचे सोडून देवळाली प्रवरा शहरातील डेपोवर कारवाई करताना पहावयास मिळतात.
राहूरी फॅक्टरी येथे आज सकाळी कारखाना कॉलनीत मोठ्या प्रमाणात भाजी मंडई भरलेली होती. जवळपास २५ ते ३० दुकानदार व १०० पेक्षा जास्त नागरिकांचा जथा या ठिकाणी होता. ७ ते १० यावेळेत भाजी मंडईत गर्दी होती. १० वाजता पालिका पथकाला माहिती समजल्यावर त्यांनी भाजी मंडई हटविली. उद्या मंगळवारी पुन्हा ही भाजी मंडई भरण्याची शक्यता आहे. दारोदारी फिरून भाजीपाला विकायला कुणीही तयार नसल्याचे आज पहावयास मिळाले.


कोणत्याही टिप्पण्या नाहीत