अहमदनगर : प्रतिनिधी
अहमदनगर : प्रतिनिधी
सध्या काेराेनामुळे करण्यात आलेल्या लाॅकडाउनचा परिणाम कांद्याच्या भावावर झालेला आहे. कांद्याला मागणी कमी असल्यामुळे त्याचा परिणाम भावावर हाेत आहे. कांद्याला मागणी वाढल्यास भावात वाढ हाेणार आहे. अर्थात, त्यासाठी लॉकडाऊन संपण्याची शेतकऱ्यांना वाट पहावी लागणार आहे, तथापि, यंदा शेतकऱ्यांनी कांदा साठवणुकीला प्राधान्य दिले आहे, मात्र, काही ठिकाणी नुकत्याच झालेल्या लिलावात कांद्याला सरासरी 800 ते 1100 रुपयांचा भाव मिळाला, तर ठराविक वक्कल 1400 रुपयापर्यंत गेले.सध्या कोरोना व लॉकडाऊन असल्याने कांद्याची बाहेरील मागणी पूर्णतः बंद झाली आहे, त्यामुळे अनेक बाजार समित्यांनी लिलाव बंद ठेवले आहेत, तुरळक बाजार समित्यांचे लिलाव सुरू आहेत, तर काही बाजार समित्या 15 मे नंतर लिलाव सुरू करण्याच्या तयारीत आहे, दरम्यान, यंदा बोगस बियांणामुळे शेतकऱ्यांचे मोठे नुकसान झाले आहे, त्यामुळे शेतकऱ्यांनी मिळेल त्या दरात कांदे विकले आहेत, तर ज्या शेतकऱ्यांचा माल चांगला आहे, त्यांनी लॉकडाऊन व येणाऱ्या काळात वाढणारी मागणी लक्षात घेता कांदा साठवणुकीला प्राधान्य दिले आहे, यावर्षी प्रथमच व्यापाऱ्यासह अनेक शेतकऱ्यांनीही कांदा खरेदी करून चाळी केल्या आहेत. नेप्ती उपबाजार समितीत काल कांद्याचे लिलाव झाले. त्यात 6 हजार 590 कांदा गोणी आवक झाली हाेती. एक नंबर कांद्याला 900 ते 1100, दाेन नंबर कांद्याला 600 ते 900, तीन नंबर कांद्याला 400 ते 600, चार नंबर कांद्याला 200 ते 400 रुपयांचा भाव मिळाला. राहाता बाजार समितीत कांद्याच्या 16 हजार कांदा गाेण्यांची आवक झाली. एक नंबर कांद्याला सर्वात जास्त 1400 रुपयांचा प्रतिक्लिंटल भाव मिळाला. दाेन नंबर कांद्याला 650 ते 950, तीन नंबर कांद्याला 200 ते 600, गाेल्टी कांद्याला 700 ते 900, जाेड कांद्याला 100 ते 250 प्रतिक्विंटलचा भाव मिळाला. अकोलेत कांदा 1411 रुपये भाव निघाला. अकोले येथील कृषि उत्पन्न बाजार समितीमध्ये कांदा 3605 गोणी आवक झाली. कांद्यास बाजार भाव मिळालेले आहेत. न.1 रु 1201 ते 1411, न.2 ला रु. 951 ते 1200, न.3 ला रु. 801 ते 950, गोल्टी रु. 650 ते 1000, खाद रु.200 ते 500 प्रमाणे बाजार भाव मिळाले आहेत.


कोणत्याही टिप्पण्या नाहीत