अकोले : प्रतिनिधी अकोले तालुक्यातील अंबड येथे कोरोनाने अक्षरशः धुमाकूळ घातला आहे आतापर्यंत गावात बाधीत रूणांची संख्या जवळपास साठ व...
अकोले : प्रतिनिधी
अकोले तालुक्यातील अंबड येथे कोरोनाने अक्षरशः धुमाकूळ घातला आहे आतापर्यंत गावात बाधीत रूणांची संख्या जवळपास साठ व मृत्यू झालेल्या रुग्णांची संख्या सहा इतकी झाली आहे. तरी पण ग्रामपंचायत प्रशासन झोपी गेलंय की काय असा प्रश्न सामान्य नागरिक आता विचारायला लागलेत.गावात खाजगी विलीगिकर्ण न करता ग्रामपंचायतने स्वतंत्र विलीगिकरण कक्ष सुरू करावे अन्यथा प्रश्नाविरुद्ध आंदोलन करण्यात येईल असा इशारा माजी सरपंच दत्तू जाधव यांनी दिला.
गावातील सर्व विभागात पेशंटची संख्या वाढत चालली आहे निवडणूक होऊन तीन महिने झाले तरी आजपर्यंत गावाला ग्रामसेवक नाही.सरपंचाना गावात काय होतं ते माहिती नाही. एक महिन्यापासून गाव बंद केलंय, परंतू् ज्या घरात पेशंट आहे त्या घराची चौकशी करायला ग्रामपंचायत सरपंच उपसरपंच व सदस्यांना वेळ नाही. त्यामुळे पेशंट व घरातील लोक खुले आमपणाणे गावात फिरताना दिसतात. गावातील कोरोना समिती ही फक्त राजकिय समिती असून समितीचे सदस्य नियमांचे उल्लंघन करताना दिसतात. आजपर्यंत गावात कुठलीही निर्जंतुक फवारणी ग्रामपंचायतने केलेली नाही. गावात सार्वजनिक ठिकाणी लावलेले कन्टेनमेंट झोन बोर्ड रात्रीतुन गायब होतात, याला जबाबदार कोण? गावातील व्यवसायिक कोरोना बाधित असताना उपचार संपताच सर्व दुकाने कुठलीही परवानगी न घेताच चालू झाले आहेत. त्यामुळे नागरिकांना असंख्य अडचणी निर्माण झाल्या असून पंचायत समितीचे गटविकास अधिकारी यांनी तातडीने लक्ष देण्याची गरज आहे परंतू कोरोनाच्या पार्श्वभूमीवर प्रशासनाच्या दुर्लक्षामुळे अंबड गाव आज कोरोना हाॅटस्पाॅट होते की काय असा प्रश्न निर्माण झाला आहे. अजून गावातील किती माणसं जातात याची वाट ग्रामपंचायत प्रशासन बघतेय का असा सूर ग्रामस्थांकडून दबक्या आवाजात ऐकायला येते आहे . तरी खाजगी विलगिकरण न करता गावात ग्रामपंचायत मार्फत तातडीने विलगिकरणकक्षाची निर्मीती करावी,अशी आग्रही मागणी ग्रामस्थ करत आहेत अन्यथा ग्रामपंचायत प्रशासना विरोधात आंदोलन करण्याचा इशारा माजी सरपंच दत्तू जाधव यांनी दिला आहे.


कोणत्याही टिप्पण्या नाहीत