अकोले : प्रतिनिधी
अकोले : प्रतिनिधी
- तरुणांच्या पुढाकाराने धुमाळवाडीत सुरू झालेले "आधार कोविड विलगीकरण केंद्र".हे रुग्णांसाठी खरोखरच "आधार" ठरेल असे गौरवोद्गार अकोल्याचे माजी नगराध्यक्ष अॅड.के.डी.धुमाळ यांनी काढले.
अकोलेतील धुमाळवाडी येथील जि.प. प्राथमिक शाळेमध्ये सूरु करण्यात आलेल्या "आधार कोविड विलगीकरण केंद्र" चे उद्घाटन अॅड.धुमाळ यांच्या हस्ते झाले. यावेळी ते बोलत होते. याप्रसंगी भाजपा चे जेष्ठ नेते शिवाजीराजे धुमाळ, शिवसेनेचे अकोले तालुका प्रमुख मच्छिद्र धुमाळ, आर.एम.धुमाळ, डॉ.रवींद्र गोर्डे, अजय वर्पे, प्रविण झोळेकर, समिरन धुमाळ,अभिजित धुमाळ, संपत धुमाळ आदी मान्यवर उपस्थित होते.
अनेक गावांनी आपापल्या गावात कोविड सेंटर सुरू करण्याचा मनोदय केला. तर धुमाळवाडीने पुढाकार घेऊन सेंटर सुरू केले. हा अत्यंत स्तुत्य उपक्रम असल्याचेही अॅड.धुमाळ म्हणाले.
डॉ.रवींद्र गोर्डे यांनी सध्या हॉस्पिटलमधील परिस्थिती पाहिली तर त्याबाबत न बोललेलेच बरे.अशी स्थिती असतांना तरुणांनी पुढाकार घेऊन कोविड सेंटर सुरू केले. "माझे कुटुंब, माझी जबाबदारी" नुसार कामे करण्यास तरुणांची देखील भक्कम साथ आहे. हे यातून दिसून येते. तर शिवसेनेचे अकोले तालुका प्रमुख मच्छिद्र धुमाळ यांनी अडचणीत सर्वोतोपरी सहकार्य करण्याचे आश्वासन देत कोणताही नागरिकांनी आजार अंगावर न काढता त्वरित उपचार घ्यावेत असे आवाहन केले.
भाजपाचे शिवाजीराजे धुमाळ यांनी संपूर्ण जगात कोविड चे महाभयानक रूप असून आता तो गावागावात येऊन पोहोचला आहे. अशा परिस्थितीत फक्त ,शासन किती मदत करणार? म्हणूनच गावांनी पुढाकार घेऊन सेंटर सुरू करून महामारीविरुद्ध लढा उभारावा असे आवाहन केले.
'यांच्यात तर देवाचे दर्शन'
धुमाळवाडी केंद्रात उपचारार्थ दाखल कचरू गोर्डे म्हणाले की "मी व माझी मुलगी अनुष्का येथे उपचारार्थ दाखल झालो आहोत. येथील सर्व व्यवस्था अतिशय उत्कृष्ठ असून येथील डॉक्टर, नर्सेस, सर्व कार्यकर्ते यांच्यात देवाचे दर्शन झाले."- कचरू गोर्डे
सर्व रुग्णांना व्यवस्थित सुविधा मिळाव्यात यासाठी आर. एम. धुमाळ यांच्या मार्गदर्शनाखाली अजय वर्पे, प्रविण झोळेकर, समिरन धुमाळ, अभिजित धुमाळ व त्यांचे सहकारी परिश्रम घेत आहेत. याप्रसंगी आर. एम. धुमाळ म्हणाले की सध्या आम्ही 25 बेडचे सेंटर सुरू केले असून गरजेनुसार त्याची क्षमता वाढविण्याचीही आमचीही तयारी आहे. याकामी धुमाळवाडी व परिसरातील जनतेने भरीव आर्थिक व वास्तुरुपाने सहकार्य केल्याचे त्यांनी स्पष्ट केले. तसेच येथे रुग्णांना वेळेवर औषधे, नास्ता, शाकाहारी-मांसाहारी भोजन, फळे तसेच दिवसातून 3 वेळा वाफ दिली जाते. त्यामुळे रुग्ण निश्चितच लवकर बरे होतील असा विश्वास त्यांनी व्यक्त केला.
समारंभास परिसरातील नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते. उपस्थितांचे आभार आर.एम. धुमाळ यांनी मानले.
.


कोणत्याही टिप्पण्या नाहीत