देवळाली प्रवरा : प्रतिनिधी देवळाली प्रवरा व राहुरी फँक्टरी येथे नागरिक शासनाने घालुन दिलेले बंधने, सामाजिक अंतर, आदी गोष्टी काटेकोरपणे प...
देवळाली प्रवरा : प्रतिनिधी
देवळाली प्रवरा व राहुरी फँक्टरी येथे नागरिक शासनाने घालुन दिलेले बंधने, सामाजिक अंतर, आदी गोष्टी काटेकोरपणे पाळत नसल्याने रूग्ण संख्या वाढत आहे. देवळाली प्रवरातील एका कुटुंबातील 7 वर्षाच्या मुलास कोरानाची बाधा पोहचली आहे.देवळाली प्रवरात पुन्हा कोरोना बाधितांचा आकडा फुगला असुन देवळाली प्रवरा व राहुरी फँक्टरी असे 40 रुग्ण बाधित आढळले आहेत.
राहूरी तालुक्यात दररोज मोठ्या प्रमाणात कोरोना रूग्ण सँख्या वाढत आहे. मंगळवार 4मे व दि.5 मे या दोन दिवसात तालुक्यात दिवसभरात 536 कोरोना रूग्ण आढळून आले आहेत.
तर देवळाली प्रवरात व राहूरी फॅक्टरीत गेल्या दोन दिवसात 40 कोरोना रूग्ण आढळून आले आहेत. यामध्ये देवळालीत 31 तर फॅक्टरीत 9 कोरोना रूग्ण आढळून आले आहेत.
शासनाने जनता संचार बंदी असतानाही नागरिक माञ नियमांचे उल्लघन करताना दिसतात.कोरोना कमी करण्यासाठी सामाजिक अंतर,गर्दी टाळणे या बाबतीत नागरिकांनी काळजी घ्यावी. कामानिमित्त बाहेर येणाऱ्या नागरिकांनी योग्य ती काळजी घ्यावी असे आवाहन प्रशासनाकडून करण्यात आले आहे.



कोणत्याही टिप्पण्या नाहीत