कोपरगाव प्रतिनिधी सध्या कोरोनाने घातलेले थैमान बेड ऑक्सिजन आणि रेमडेसिवीर अभावी प्राणास मुकलेली माणसे आणि आरोग्य विभागाचा उडाले...
कोपरगाव प्रतिनिधी
सध्या कोरोनाने घातलेले थैमान बेड ऑक्सिजन आणि रेमडेसिवीर अभावी प्राणास मुकलेली माणसे आणि आरोग्य विभागाचा उडालेला फज्जा बघुन,माणसांच्या उरात धडकी भरली असल्याने कोरोना दोन हात दूर कसा राहील या अपेक्षेने आता लसीकरणासाठी रांगा लागल्या असुन कोपरगाव ग्रामीण रुग्णालयाच्या आवारात सकाळी सातपासुन लागलेल्या पुरुष महिलांच्या रांगेत सोशल डिस्टंसिंगची ऐशीतैशी असल्याचे चित्र बघायला मिळत आहे.
ग्रामीण रुग्णालयाचे वैद्यकीय अधिक्षक यांनी बुधवारी दिलेल्या माहितीनुसार १८ते ४५ वयोगटातील नागरिकांसाठी पहिला डोस कोव्हॕक्सीन ग्रामीण रुग्णालय मध्ये दिनांक ६ मे रोजी ९ ते ४ वाजेपर्यंत ठेवण्यात आला असुन ज्यांनी ऑनलाईन नोंदणी केली आहे त्यांनीच सकाळी ८ वाजता टोकन घ्यावे.
लसीकरण फक्त पहिला डोस १८ते ४५ वयोगटासाठीच आहे. कोव्हॕक्सीन दुसरा डोस सोमवार नंतर दिला जाईल, दुसऱ्या डोस ज्यांचा आहे त्यांनी येऊ नये.अशे सूचित केले होते मात्र किती लसी उपलब्ध आहे.याची कल्पना न दिल्यामुळे आपला विहित वेळेत नंबर लागुन लस मिळेल या अपेक्षेने नागरीकांच्या रुग्णालयापासुन प्रवेशव्दारापर्यंत रांगाच रांगा लागल्या होत्या.
ग्रामीण रुग्णालयात आज फक्त ३०० कोव्हॕक्सीन लस उपलब्ध असुन गर्दी जास्तच झालेली आहे.नागरीक सांगुनही ऐकत नाही.साडेसात वाजता संरक्षण मागितले असतानाही साडेआठ वाजेपर्यंत तरी संरक्षण उपलब्ध झालेले नाही.कोपरगाव तालुक्यात कोरोनाने कहर मांडला असुन,दैनंदिन रुग्णांची शंभरी पारचाच आकडा असतो.अनेकजण गतप्राणही झाले.कोरोना होऊच नये या भितीने लसीकरणासाठी गेलेल्या नागरीकांनी सोशल डिस्टंसिंगचा नियम न पाळल्याने आणि प्रशासनानेही तिथे खमकी भूमिका न घेतल्याने लसीपुर्वीच कोरोनाचा प्रादुर्भाव होण्याची शक्यता दाट आहे.उद्या किती लसी उपलब्ध आहे.टोकन कुणाला दिले जाईल ही जनजागृती ग्रामीण रुग्णालयाकडून झाली असती तर कदाचित गर्दिवर नियंत्रण मिळविता आले असते.


कोणत्याही टिप्पण्या नाहीत