संसर्ग टाळण्यासाठी प्रभागनिहाय लसीकरण केंद्र सुरू करा- कदम - आवाज जनतेचा

Page Nav

HIDE

Grid

GRID_STYLE

Classic Header

{fbt_classic_header}

News

latest

संसर्ग टाळण्यासाठी प्रभागनिहाय लसीकरण केंद्र सुरू करा- कदम

  कोपरगाव प्रतिनिधी शासनाच्या निर्देशानुसार 18 वर्षांपुढील सर्वांचे कोरोना प्रतिबंधक लसीकरण 1 मे पासून करण्यात येत आहे. मात्र, संभाव्य...

 कोपरगाव प्रतिनिधी

शासनाच्या निर्देशानुसार 18 वर्षांपुढील सर्वांचे कोरोना प्रतिबंधक लसीकरण 1 मे पासून करण्यात येत आहे. मात्र, संभाव्य गर्दीतून कोरोना संक्रमण टाळण्यासाठी कोपरगाव पालिका हद्दीतील चौदा प्रभागांत खासगी डॉक्टरांची नेमणूक करुन लसीकरण केंद्र सुरू करावे, अशी मागणी नगरसेवक जनार्दन कदम यांनी ग्रामीण रुग्णालयाच्या वैद्यकीय अधीक्षकांकडे केली आहे.

याबाबत वैद्यकीय अधीक्षक डॉ.कृष्णा फुलसौंदर यांना दिलेल्या निवेदनात म्हटले आहे की, 18 वर्षांपुढील सर्वांना शासनाच्या निमयानुसार 1 मे पासून लसीकरण करण्यात येत आहे. यासाठी मोठ्या प्रमाणात ऑनलाईन नोंदणी होत आहे. मात्र, लसींचा मोठा तुटवडा निर्माण होत आहे. कोपरगाव ग्रामीण रुग्णालयात लसीकरण केंद्र असल्याने लाभार्थी गर्दी करत आहे. यातून कोरोनाचा संसर्ग होण्याची शक्यता नाकारता येत नाही. त्यासाठी पूर्व नियोजन गरजेचे असून, पालिका हद्दीतील सर्व चौदा प्रभागांमध्ये खासगी डॉक्टरांची नेमणूक करुन लसीकरण केंद्र सुरू करावे. आणि प्रभागनिहायच नागरिकांचे लसीकरण करावे, अशी मागणी नगरसेवक कदम यांनी केली आहे.

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत