राहुरी/प्रतिनिधी राहुरी तालुक्यातील ताहाराबाद ग्रामीण रूग्णालयात कोरोना लसीकरण प्रसंगी ग्रामस्थ आणि आरोग्य विभागामध्ये चांगलीच खडाजंग...
राहुरी/प्रतिनिधी
राहुरी तालुक्यातील ताहाराबाद ग्रामीण रूग्णालयात कोरोना लसीकरण प्रसंगी ग्रामस्थ आणि आरोग्य विभागामध्ये चांगलीच खडाजंगी व दमबाजी झाल्याची घटना घडली.गावाबाहेरील लोकांना लसीकरण करू नका फक्त गावातीलच लोकांना लसीकरण करण्यास प्राधान्य द्या या मुद्द्यावरून स्थानिक नागरीक आणि आरोग्य विभाग अधिकारी यांच्यामधे हि चकमक घडल्याने काही काळ तणाव निर्माण झाल्याची माहीती मिळते.
कोरोना च्या लसीकरणाबाबत आरोग्य केंद्रात गर्दी होऊ नये म्हणून आता प्रत्येक गावात लसीकरण करण्याचा निर्णय झाला आहे.त्याच दृष्टीने ठिकठिकाणी हे लसीकरण सुरू आहे. ताहराबाद (ता.राहुरी) येथील ग्रामीण रूग्णालयात सकाळपासून लसीकरणासाठी परीसरातील नागरीकांनी मोठी गर्दी केली होती. दरम्यान येथील स्थानिक नागरीकांनी बाहेरील गावातील लोकांना लसीकरण करू नका या मुद्यावरून आरोग्य विभागाचे अधिकारी आणि स्थानिक नागरीकांमधे हा वाद झाल्याचे समजते.


कोणत्याही टिप्पण्या नाहीत