सात्रळ : सुनील सात्रळकर एकीकडे जगातील शास्त्रज्ञाच्या मते कोरोना विरुद्धच्या लढ्यात लसीकरण हे महत्वाचे पाऊल असल्याचा सल्ला देत असत...
सात्रळ : सुनील सात्रळकर
एकीकडे जगातील शास्त्रज्ञाच्या मते कोरोना विरुद्धच्या लढ्यात लसीकरण हे महत्वाचे पाऊल असल्याचा सल्ला देत असताना दुसरीकडे खेडोपाडी असलेल्या छोट्या आरोग्य उपकेंद्रांना पाहिजे तितक्या प्रमाणात लस उपलब्ध नसल्याचे चित्र जिल्ह्यात दिसत आहे.
सात्रळ गावाची लोकसंख्या 7078 असताना येथील आरोग्य उपकेंद्रास आत्तापर्यंत फक्त 50 लसीचे डोस उपलब्ध झाले असून लसीकरण योजनेचे तीन तेरा झाल्याचे चित्र आहे.मिळालेल्या माहिती नुसार 380 व्यक्तींचं पाहिला डोस लसीकरण झालेले असून 151 जणांनी दुसरा डोस मिळालेला आहे, यातील बहुतांशी व्यक्तींनी येथील उपकेंद्रात लस उपलब्ध नसल्यामुळे त बाहेर गावी जाऊन लस घेतलेली आहे. विशेषतः जेष्ठ नागरिकांना दुसरा डोस मिळण्याकरिता गुहा केंद्रावर हेलपाटे मारावे लागल्याने मनस्ताप सहन करावा लागत आहे.
तालुक्यातील मंत्रांनी "गाव तिथे लसीकरण" या राबिवलेल्या योजनेचा प्रवरा पट्ट्यातील गावांमध्ये पूर्णपणे फज्जा उडाल्याचे चित्र अनुभवायास मिळते आहे. नुकत्याच पंतप्रधान मोदी बरोबर झालेल्या सचित्र मुलाखतीत जिल्हाधिकाऱ्यांनी कोरोनाविरुद्धची लढाई ची उपाय योजनांची माहितीची सकारात्मक चर्चा असताना दुसरीकडे याच जिल्यातील छोट्या उपकेंद्रेंना लसीचा तुटवद्याच्या चित्र मुळे सरकारी योजना कागदावरच का अशी चर्चा ग्रामस्तामध्ये होत आहे. सात्रळ उपकेंद्रास तातडीने गरजे इतका लस पुरवठा होण्याची मागणी विखे कारखान्याचे उपाध्यक्ष विश्वासराव कडू, सामाजिक कार्यकर्ते रमेश पन्हाळे, सोनगावचे उपसरपंच किरण अंत्रे व ग्रामस्थ यांनी केली आहे.


कोणत्याही टिप्पण्या नाहीत