जन्मदात्या बापावर झाडल्या गोळ्या ; नगरमध्ये उपचार सुरू - आवाज जनतेचा

Page Nav

HIDE

Grid

GRID_STYLE

Classic Header

{fbt_classic_header}

News

latest

जन्मदात्या बापावर झाडल्या गोळ्या ; नगरमध्ये उपचार सुरू

.  नगर:  प्रतिनिधी    आईला मारहाण झाल्याने रागाच्या भरात आष्टी ( जि. बीड) येथील विनायकनगर भागात मुलानेच पित्यावर तीन गोळ्या झाडल्याची घटन...

.  नगर:  प्रतिनिधी   


आईला मारहाण झाल्याने रागाच्या भरात आष्टी ( जि. बीड) येथील विनायकनगर भागात मुलानेच पित्यावर तीन गोळ्या झाडल्याची घटना गुरुवारी रात्री घडली. दरम्यान, यामध्ये वडील गंभीर जखमी झाले असून त्यांना उपचारासाठी अहमदनगरला हलवण्यात आले आहे.  गोळीबार करणारा मुलगा नुकताच सैन्यातून निवृत्त झालेला आहे. 

.


आष्टी पोलिसांनी आरोपीला अटक केली आहे. उपविभागीय पोलीस अधिकारी विजय लगारे व पोलीस निरीक्षक सलीम चाऊस याप्रकरणी तपास करीत आहेत. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, संतोष किसन लटपटे ( वय ५० ) असे जखमी व्यक्तीचे नाव आहे. त्यांच्यावर मुलगा किरण संतोष लटपटे (वय २४) याने घरगुती वादातून तीन गोळ्या झाडल्या. यातील दोन गोळ्या संतोष लटपटे यांच्या पोटावर लागल्याने ते गंभीर जखमी झाले. जखमी संतोष लटपटे यांना दारूचे व्यसन होते. यातून घरात सातत्याने छोटे-मोठे वाद होत असत. यातून हा प्रकार घडला असल्याचे पोलिसांनी सांगितले. आरोपीची सध्या कसून चौकशी सुरू आहे.

.


संतोष लटपटे तीन महिन्यांपूर्वी सैन्य दलातून निवृत्त घेऊन गावी आल्याची माहिती आहे. त्याच्याकडे बंदुकीचा परवाना होता. गुरुवारी सायंकाळी या बंदुकीतूनच त्याने पित्यावर तीन गोळ्या झाडल्या. आरोपी किरण लटपटे याने पोलिसांना दिलेल्या जबाबात म्हटले आहे की, त्याचे वडील संतोष लटपटे यांनी दारू पिऊन आईला मारहाण सुरू केली होती. यानंतर मला राग अनावर झाल्याने बंदुकीतून गोळ्या झाडल्या.

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत