तलाठ्यास दोघांकडून मारहाण ; राहुरी तालुक्यातील 'या' गावात घडली घटना - आवाज जनतेचा

Page Nav

HIDE

Grid

GRID_STYLE

Classic Header

{fbt_classic_header}

News

latest

तलाठ्यास दोघांकडून मारहाण ; राहुरी तालुक्यातील 'या' गावात घडली घटना

  राहुरी/प्रतिनिधी            राहुरी तालुक्यातील मानोरी येथील तलाठ्यास शेतीचा गट नंबर चा उतारा देण्याच्या कारणावरून शिवीगाळ करून मारहाण ...

 


राहुरी/प्रतिनिधी 


         

राहुरी तालुक्यातील मानोरी येथील तलाठ्यास शेतीचा गट नंबर चा उतारा देण्याच्या कारणावरून शिवीगाळ करून मारहाण झाल्याप्रकरणी दोन जणांविरोधात शासकीय कामकाजात अडथळा आणल्याप्रकरणी गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

मानोरी येथील तलाठी राहुल राजकुमार कराड यांनी दिलेल्या फिर्यादी म्हटले आहे की, आरोपी वसंत फ्रान्सिंस आढाव,वैभव वसंत आढाव ,दोघे राहणार मानोरी यांनी गुरूवारी दुपारी तलाठी कार्यालयात येऊन गट नंबर 188/अ या गटावरील शर्त खरेदी फेरफार  नं. 846हा मला कमी कर द्या असे म्हणाले असता  त्त्याना फिर्यादी तलाठी कराड म्हणाले की  सदर फेलफार हा मुळात रद्द  असल्याने  कमी करण्याचा प्रश्न  उदभवत नाही  तसेच  तशी ऑनलाईन ई फेरफार  प्राणाली मध्ये  सुविधा देखील उपलब्ध नाही  असे समजावुन सांगत असताना त्याचा राग येवुन आरोपी यांनी शिवीगाळ करून गंचाडी धरून मारहाण केली तसेच टेबल वरील लॅपटॉप व प्रिटर यांचे देखील नुकसान केले.तसेच पोलिसात  तक्रार केली  तर  तुमच्या  विरूध्द  ॲट्रोसिटी दाखल  करील अशी  धमकी देखील दिली असल्याचे फिर्यादीत म्हटले आहे.याप्रकरणी राहुरी पोलिसात आरोपी वसंत फ्रान्सिंस आढाव वैभव वसंत आढाव यांच्या विरोधात गु.रजि.नं. व कलम -| 384 / 2021 भा.द.वि कलम-353,332,504,506,188,269,34 प्रमाणे गुन्हा दाखल करण्यात आला आहे.पोलिस निरीक्षक नंदकुमार दुधाळ यांच्या मार्गदर्शनाखाली पोलिस उपनिरीक्षक निरज बोकील हे पुढील तपास करत आहेत.

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत