राहुरी (प्रतिनिधी) राहुरी तालुक्यातील कनगर परंतु मुक्काम राहुरी फॅक्टरी येथील ह.भ.प.जगन्नाथ धोंडिराम जाधव (वय ५८) यांचे नुकतेच अल्पशा...
राहुरी (प्रतिनिधी)
राहुरी तालुक्यातील कनगर परंतु मुक्काम राहुरी फॅक्टरी येथील ह.भ.प.जगन्नाथ धोंडिराम जाधव (वय ५८) यांचे नुकतेच अल्पशा आजाराने निधन झाले आहे.
शांत, संयमी ,धार्मिक, गायन कार्याची आवड असणारे जाधव हे ओम गुरूदेव भजनी मंडळाचे अध्यक्ष होते. माजी सहाय्यक सुरक्षा अधिकारी, माजी होमगार्ड समादेशक म्हणून त्यांनी काम केलेले आहे.तसेच नाट्य संगित, गायन या क्षेत्रात अनेक कलावंत घडविण्यात त्यांचा मोठा वाटा होता.अल्पशा आजाराने त्यांना ग्रासले होते.उपचारादम्यान त्यांची प्राणज्योत मालवली.त्यांच्या अकाली निधनाने परिसरात हळहळ व्यक्त केली जात आहे. त्यांच्या मागे वडील, पत्नी,दोन मुले,एक मुलगी,भाऊ,भावजयी सुना नातवंडे असा मोठा परिवार आहे. 'आवाज जनतेेचा'चे संंपादक श्रीकांत जाधव यांचे ते वडील होत.


कोणत्याही टिप्पण्या नाहीत