कोपरगाव/प्रतिनिधी कोरोनाच्या जीवघेण्या संकटात शासन, प्रशासन यांच्याबरोबर अनेक स्वयंसेवी संस्था व धार्मिक संस्था मदत करत आहेत. ग...
कोपरगाव/प्रतिनिधी
कोरोनाच्या जीवघेण्या संकटात शासन, प्रशासन यांच्याबरोबर अनेक स्वयंसेवी संस्था व धार्मिक संस्था मदत करत आहेत. गेल्या दीड वर्षापासून हे संकट घोंगावत असताना नांदेड येथील जथेदार बाबा कुलवंतसिंगजी तख्त सचखंड गुरुद्वाराचे प्रमुख पुजार्यांनी संपूर्ण दान कोविडच्या संकटासाठी दिले आहे. याचबरोबर रोज दोन लाख गरजूंना भोजन देत आहे. त्यांच्या याच सामाजिक उत्तरदायित्वाच्या उपक्रमाचा इतर धर्मियांनी आदर्श घ्यावा, असे आवाहन कोपरगावचे माजी नगराध्यक्ष मंगेल पाटील यांनी प्रसिद्धी पत्रकाद्वारे केले आहे.
सदर प्रसिद्धी पत्रकात पाटील यांनी म्हटले आहे की, कोरोना महामारीतून जनतेला वाचविण्यासाठी शासन, सरकार यांच्या व्यतिरिक्त सर्व जाती धर्मातील धार्मिक संस्थांनी स्वतःचा खजिना बाहेर काढून लोकांना वाचविण्याची ही वेळ ओळखून तत्काळ पुढे येण्याची गरज आहे. या संकटात नांदेड येथील जथेदार बाबा कुलवंतसिंगजी तख्त सचखंड गुरुद्वाराचे प्रमुख पुजार्यांनी नुकतेच 50 वर्षांपासून गुरुद्वारामध्ये जमा झालेले दान रुग्ण वाचविण्यासाठी हॉस्पिटल, मेडिकल कॉलेज उभारणीसाठी दिले. याचबरोबर रोज दोन लाख लोकांना जेवण देत आहेत.
दरम्यान, कोरोनाचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी शासनाने कठोर निर्बंध लागू केलेले आहेत. यामध्ये अनेकांचे व्यवसाय बुडाले असून अनेकजण बेरोजगार झाले आहेत. यामुळे उपासमारीचे प्रमाण वाढले आहे. यासाठी शीख धर्मीय बांधवांनुसार इतर जाती धर्मातील धार्मिक संस्थांनी देखील संकटात मदत करण्यासाठी तत्काळ पुढे येण्याची गरज आहे. यातून अनेक निष्पापांचा जीव वाचेल असा आशावाद माजी नगराध्यक्ष पाटील यांनी व्यक्त केला आहे.


कोणत्याही टिप्पण्या नाहीत