देवळाली कोविड सेंटरला प्राथमिक शिक्षकांकडून कॉन्सनट्रेटर मशीन भेट - आवाज जनतेचा

Page Nav

HIDE

Grid

GRID_STYLE

Classic Header

{fbt_classic_header}

News

latest

देवळाली कोविड सेंटरला प्राथमिक शिक्षकांकडून कॉन्सनट्रेटर मशीन भेट

  राहुरी : प्रतिनिधी।  देवळाली प्रवरा येथील कोविड केअर सेंटर येथे राहुरी तालुक्यातील प्राथमिक शिक्षकांच्या वतीने ऑक्सिजन कॉन्सनट्रेटर मश...

 

राहुरी : प्रतिनिधी। 


देवळाली प्रवरा येथील कोविड केअर सेंटर येथे राहुरी तालुक्यातील प्राथमिक शिक्षकांच्या वतीने ऑक्सिजन कॉन्सनट्रेटर मशीन देवळाली प्रवरा नगरपालिकेचे नगराध्यक्ष सत्यजित कदम यांच्या उपस्थितीत देण्यात आले. या मशीनमूळे कोविड सेंटरमध्ये एका बेड ची भर होणार असून निश्चित याचा फायदा हा रुग्णांना होईल, असे सांगून शिक्षकांनी केलेल्या या मदतीबद्दल सत्यजित कदम यांनी समाधान व्यक्त केले.

नगरसेवक अमोल कदम यांनीही शिक्षकांच्या या कामाचे कौतुक केले. यावेळी मुसमाडे डॉक्टर, रवी देवगिरे  कोविड केअर सेंटर मधील डॉ. चौधरी,  डॉ. शिंदे, डॉ. ढुस, डॉ. वीर तसेच देवळाली प्रवरा, गुहा, भटारकर वस्ती आणि टाकळी मिया केंद्रातील प्रातिनिधिक स्वरूपात शिक्षक उपस्थित होते. अँटीजन टेस्ट असतील किंवा आरटीपीसीआर टेस्ट असो याठिकाणीही शिक्षक आपले दिलेले काम बजावत आहे. लसीकरण, कॉन्टॅक्ट ट्रेसिंग यासारख्या कामामध्येही शिक्षक आपली भूमिका पार पाडत आहे. संपूर्ण कोरोना काळात चेक पोष्ट, स्वस्त धान्य दुकान, माझे गाव माझे कुटुंब सर्व्हे, तापमान व ऑक्सिजन तपासणी, शेल्टर होम, कोरन्टाइन सेंटर, कोविड सेंटर या आणि अशा अनेक प्रकारची कामे शिक्षकांनी केली आहेत. परंतु हे सर्व करत असताना शिक्षक कधीही आपली सामाजिक जाणिव विसरत नाही हे पुन्हा एकदा दिसून आले. गेल्या अनेक दिवसांपासून तालुक्यातील विविध कोविड केअर सेंटर्स ला तालुक्यातील प्राथमिक शिक्षकांच्या वतीने विविध स्वरूपातील मदत केली जात आहे. बालाजी, वांबोरी, विद्यापीठ, म्हैसगाव, कनगर या ठिकाणीही याआधी मदत करण्यात आली. ज्या ज्या ठिकाणी संधी मिळते त्या त्या ठिकाणी प्राथमिक शिक्षक विविध माध्यमातून सामाजिक सेवा करताना दिसून येतात. डॉ. चौधरी व डॉ. शिंदे यांनी सेंटरला कॉन्सनट्रेटर मशीन भेट म्हणून दिल्याबद्दल आभार व्यक्त केले.

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत