अकोले : प्रतिनिधी- तालुक्यातील मेंहदुरी गावचे शिवारातील गट क्रमांक 55/2 मध्ये उसाचे शेतात 75 किलो वजनाची ओली गांजा चे झाडे हिरवेगार...
अकोले : प्रतिनिधी-
तालुक्यातील मेंहदुरी गावचे शिवारातील गट क्रमांक 55/2 मध्ये उसाचे शेतात 75 किलो वजनाची ओली गांजा चे झाडे हिरवेगार पाला असलेली साडे सात लाख रूपये किमतीची बेकायदेशीर रित्या विक्रीसाठी लागवड करुन ताब्यात बाळगताना मिळून आल्याने अकोले पोलिसांनी आरोपी रोडाजी उर्फ रोहीदास रामभाऊ पथवे (बहिरवाडी) यास अटक करुन गुन्हा दाखल केला आहे.
याबाबत अकोले पोलिस स्टेशनला सफौ जब्बीर अन्वरअली सय्यद यांनी फिर्याद दिली असुन यात म्हटले आहे कि काल बुधवार दि १९ मे २०२१ रोजी सकाळी आरोपी रोडाजी उर्फ रोहीदास रामभाऊ पथवे (बहिरवाडी)यांचे मालकीचे मेंहदुरी गावचे शिवारातील शेत गट क्रमांक 55/2 मधील उसाचे शेतात स्वताचे आर्थिक फायद्याकरीता विनापरवाना बेकायदेशीर रित्या विक्री करण्याचे उद्देशाने केंद्रसरकारची बंदी असलेली नशाकारक सात लाख पन्नास हजार रुपये किमंतीचा 75 किलो वजानाची लहान मोठी गांजा वनस्पतीचे झांडाची लागवड करुन स्वताचे ताब्यात बाळगताना मिळुन आले यावरून अकोले पोलिस ठाण्यात गु.र.न.161/2021 एन डी पि एस कायदा 1985 चे कलम 20 (क)(ख) (1) प्रमाणे दाखल करुन आरोपीला अटक करण्यात आली आहे.पुढील तपास पोलिस निरीक्षक अभय परमार करत आहे.


कोणत्याही टिप्पण्या नाहीत