आपला आनंदी जीवनाचा जन्मसिद्ध अधिकार खरचं हिरावलाय का ? - आवाज जनतेचा

Page Nav

HIDE

Grid

GRID_STYLE

Classic Header

{fbt_classic_header}

News

latest

आपला आनंदी जीवनाचा जन्मसिद्ध अधिकार खरचं हिरावलाय का ?

करंजी : सुरज  क्षेत्रे स्वतःची मालकीची  शेती  असणाऱ्या व नसणाऱ्या दोन्ही भावा बहिनीनो, विषमुक्त अन्न ,प्रदूषण मुक्त पाणी,हवा व पर्यावरण आणि ...

करंजी : सुरज  क्षेत्रे


स्वतःची मालकीची  शेती  असणाऱ्या व नसणाऱ्या दोन्ही भावा बहिनीनो, विषमुक्त अन्न ,प्रदूषण मुक्त पाणी,हवा व पर्यावरण आणि आरोग्य संपन्न सुखी ,आनंदी जीवन मिळवणे हा आपला प्रत्येक सजीवांचा जन्मसिद्ध नैसर्गिक अधिकार आहे व आपण तो मिळवणार आहोत,आपण शेतकरी असो, शेतमजूर असो ,शहरातील चाकर मान्या असो ,कि विषारी कीटकनाशकांची व रासायनिक खतांची निर्मिती करणारा उद्योगपती असो :राजकारणी असो की समाजकारणी असो ,गर्भ श्रीमंत असो की भिकारी असो ,संत असो की महागुंड असो,हरितक्रांती रुपी शोषक जागतिक महाव्यवस्थेने आपला हा जन्मसिद्ध अधिकार हिरावून घेतला आहे हे लक्षात ठेवा. आज मानवी अन्न ,पाणी ,हवा,हे तर विषारी झालेलेच आहे सोबत दूध ,फळे, भाज्या ,मांस हे सुद्धा विषारी झालेलं आहे, ह्यातून दूध पाजणाऱ्या मातेच्या स्तनातील दूधही सुटलं नाही . अन्न बेचव ,निसत्व झालं आहे फळे भाज्या व दुधाला चव सुगधं स्वाद व पौष्टिकता राहिली नाही,  पंधरा वीस वर्षाच्या तरुण मूला मुलींचे डोक्याचे केस पांढरे झाले आहेत त्यांना गॉगल लागले आहेत ,शरीर अस्थपजींर झालं आहेत  ,कामाचा आनंद कमी झाला आहे ,धाडस करण्याची क्षमता कमी झाली आहे,तर मित्रानो हे कशामुळे? विषारी व कस नसलेल्या अन्नामुळे !. हे जर थांबवायच असेल तर आज नैसर्गिक शेती सेंद्रिय शेती ही काळाची गरज आहे

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत