. अकोले : प्रतिनिधी तालुक्यातील सर्वच भागात कोरोनाचे संकट आ वासून उभे असताना शेतकरी राजा मात्र खरीप हंगामाच्या जोरदार तयारीला लागले...
.
अकोले : प्रतिनिधी
तालुक्यातील सर्वच भागात कोरोनाचे संकट आ वासून उभे असताना शेतकरी राजा मात्र खरीप हंगामाच्या जोरदार तयारीला लागलेला आहे. औत, काठी घेऊन शेतकरी राजा सुसज्ज झालेला आदिवासी पट्ट्यामध्ये बघायला भेटतो. साधारणतः खरीप हंगाम सुरू होण्याअगोदर भात रोपांची रोपवाटिका तयार करण्यासाठी राबनी करणे, शेताची मशागत करून शेत लागवडीसाठी तयार करणे, भात, नागली , वरई या प्रमुख पिकांच्या लागवडीसाठी पूर्वतयारी करणे यासारख्या कामांमध्ये शेतकरी व्यस्त होत असतो.
.
जगभर कोरोनाचे संकट घोंगावत असताना वर्षभराची चिंता लागून राहिलेला शेतकरी लॉक डाऊन करू शकत नाही हेच सत्य आहे.
आदिवासी पट्ट्यातील बहुतेक गावांमध्ये मान्सून पूर्व शेतीच्या कामाची तयारी वेग धरू लागली आहे. त्यातच कृषी निविष्ठा पुरवणारे कृषी सेवा केंद्र व निविष्ठा भांडार बंद असल्याने शेतकऱ्यांना मोठ्या अडचणीला सामोरे जावे लागत आहे. बियाणे ,औषधे ,खते यांची जमवाजमव करून ठेवणे कठीण झाले आहे. लॉक डाउन नंतर तुंबळ गर्दी कृषी सेवा केंद्रांवर होण्याचा धोका वाढला आहे.
शेतकऱ्याला येणाऱ्या हंगामाची आस लागून राहिलेली आहे .असेच काहीसे चित्र ग्रामीण आणि आदिवासी भागांमध्ये पाहायला सध्या मिळत आहे.


कोणत्याही टिप्पण्या नाहीत