राहुरी तालुक्यात अवैध व्यवसायिकांवर पो.नि.दुधाळ यांच्या धडक कारवाया - आवाज जनतेचा

Page Nav

HIDE

Grid

GRID_STYLE

Classic Header

{fbt_classic_header}

News

latest

राहुरी तालुक्यात अवैध व्यवसायिकांवर पो.नि.दुधाळ यांच्या धडक कारवाया

गोविंद फुणगे/राहुरी      राहुरी तालुक्यामध्ये अवैध दारू विक्री करणाऱ्यासह जुगार अड्यावर राहुरी पोलिसांनी आता धडक कारवाई सुरू केली आ...


गोविंद फुणगे/राहुरी 


   

राहुरी तालुक्यामध्ये अवैध दारू विक्री करणाऱ्यासह जुगार अड्यावर राहुरी पोलिसांनी आता धडक कारवाई सुरू केली आहे.तालुक्यात एकाच दिवसात तीन ठिकाणी या कारवाया केल्याने अवैध व्यवसायीकांचे चांगलेच धाबे दणाणले आहेत.

नुकतेच राहुरी शहरातील नगर-मनमाड राज्य महामार्गावर असलेल्या हॉटेल काका का ढाबा या ठिकाणी तहसीलदार शेख यांनी कारवाई केली होती तरी देखील या ठिकाणी दारू विक्री सुरू असल्याची माहिती पोलिसांना मिळताच पोलिस निरीक्षक नंदकुमार दुधाळ यांच्यासह दिनकर चव्हाण, ताजने,अदिनाथ पाखरे यांच्यासह पोलिस पथकाने या ठिकाणी छापा टाकत पाच हजार दोनशे साठ रूपये किमतीच्या देशी विदेशी दारूच्या बाटल्या जप्त करण्यात आल्या आहेत.अदिनाथ पाखरे यांच्या फिर्यादीनुसर हाॅटेल मालक सुनिल सुकदेव घुले,राहणार जोगेश्वरी आखाडा यांच्यावर गुन्हा दाखल करण्यात आला आहे. तर दुसरीकडे उंबरे(ता.राहुरी) येथे दारू अड्यावर छापा टाकत  देशी विदेशी दारूच्या बाटल्या सह ३१,६९० रूपयांचा मुद्देमाल हस्तगत करण्यात आला असुन पोकाॅ.शिवाजी ढाकणे यांच्या फिर्यादी वरून गोरक कारभारी साठे,राहणार ब्राह्मणी याच्यावर गुन्हा दाखल करण्यात आला आहे. तसेच  मांजरी(ता.राहुरी) बाजार तळावर मटका अड्यावर पोलिसांनी छापा टाकत तीन हजार रूपयांचा मुद्देमाल हस्तगत करत पो.काॅ.दिपक फुंदे यांच्या फिर्यादी वरून आरोपी दिपक अंबादास मैड, राहणार पानेगाव याच्यावर गुन्हा दाखल हि कारवाई करण्यात आली आहे.

 सध्या लाॅकडाऊनमुळे सर्वत्र गंभीर परिस्थिती निर्माण झाली परंतु काही लोक थोडा पैसा कमविण्याच्या नादात अवैध धंदे करून आपला आणि इतरांचा जीव देखील धोक्यात घालत आहेत. त्यामुळे राहुरी तालुक्यात कुठेही अवैध धंद्यावाल्यांची गय केली जानार नाही ;नंदकुमार दुधाळ, पोलिस निरीक्षक, राहुरी

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत