मुसळवाडी (वेबटीम) कोरोना रुग्णांची वाढ झपाट्याने वाढत असल्याचे लक्षात घेऊन मुसळवाडी ग्रामपंचायतचे युवा ग्रामपंचायत सदस्य रोहन भुजाडी व हिं...
कोरोना रुग्णांची वाढ झपाट्याने वाढत असल्याचे लक्षात घेऊन मुसळवाडी ग्रामपंचायतचे युवा ग्रामपंचायत सदस्य रोहन भुजाडी व हिंदुराजा ग्रुपच्या माध्यमातून लोकनेते रामदास पाटील धुमाळ यांचे माणुसकीचे तत्व जोपासत "माणुसकी" हे आँक्सीजनयुक्त कोविड सेंटर सुरु केले आहे.
मुसळवाडी व जवळपासच्या गावांच्या नागरिकांच्या सोयीसाठी कोविड सेंटर सुरु करण्यात आल्याचे पै. रोहन भुजाडी यांनी सांगितले.
मुसळवाडी येथे भुजाडी यांनी २५ बेडचे आँक्सीजन सुविधा असणारे कोविड सेंटर सुरु केले.
यासाठी शिवसेना उत्तर नगर जिल्हाध्यक्ष रावसाहेब खेवरे व राहुरी पंचायत समितीचे माजी सभापती सुधीर काका धुमाळ यांचे मोलाचे मार्गदर्शन लाभले आहे.
पै. रोहन भुजाडी व हिंदुराजा ग्रुपच्या माध्यमातून उभारण्यात आलेले कोविड सेंटर अनुभवी डॉक्टर यांच्या मार्गदर्शनाखाली आदी उपचार करणार आहेत.
आँक्सीजन सुविधा असणारे बेड सहजतेने उपलब्ध होत नाहीत. मात्र आता मुसळवाडी येथे कोविड सेंटर सुरू झाल्याने रुग्णांना उपचार सुविधा मिळणार असल्याने धावपळ कमी होणार आहे.


कोणत्याही टिप्पण्या नाहीत