अकोले : प्रतिनिधी। राज्याचे महाविकास आघाडी सरकारच्या वतिने अकोले तालुक्यासाठी अकोले ग्रामीण रुग्णालयाला दोन व्हेंटीलेटर आज राज्याचे उप...
अकोले : प्रतिनिधी।
राज्याचे महाविकास आघाडी सरकारच्या वतिने अकोले तालुक्यासाठी अकोले ग्रामीण रुग्णालयाला दोन व्हेंटीलेटर आज राज्याचे उपमुख्यमंञी ना.अजित दादा पवार यांचे हस्ते मंत्रालयात वैद्यकीय अधिक्षक डॅा.संजय घोगरे यांचेकडे देण्यात आले.
अकोले तालुक्यात कोरोना संकटकाळात कोरोना रुग्णसंख्या दिवसेंदिवस वाढत असल्याने तालुक्यातील आरोग्य सुविधा अपु-या पडत आहे.तालुक्याचे लोकप्रतिनिधी आमदार डॅा.किरण लहामटे यांनी राज्याचे उपमुख्यमंञी ना.अजित दादा पवार यांना तालुक्याच्या आरोग्याची कमतरतेची माहिती देवून आरोग्य सुविधा उपलब्धतेची मागणी केली होती .या मागणी नुसार आज मंत्रालयात राज्याचे उपमुख्यमंञी ना.अजित दादा पवार यांचे हस्ते सरकारच्या वतिने अकोले तालुक्याच्या रुग्णांसाठी अकोले ग्रामीण रुग्णालयाला दोन व्हेंटीलेटर अकोले ग्रामीण रुग्णालयाचे वैद्यकीय अधिक्षक डॅा.संजय घोगरे,वैद्यकीय अधिकारी डॅा.अभिनय लहामटे याचेकडे सुपूर्द केले यावेळी उपमुख्यमंञी कार्यालयातील श्री राजेंद्र शहा, स्वीय सहाय्यक अनिकेत थोरात,आदि उपस्थित होते.


कोणत्याही टिप्पण्या नाहीत