कोपरगाव : अक्षय काळे कोरोना महामारीचा सर्वत्र हाहाकार उडालेला असल्याने राज्य सरकारने दहावीच्या परीक्षा रद्द केल्या आहेत. त्यामु...
कोपरगाव : अक्षय काळे
कोरोना महामारीचा सर्वत्र हाहाकार उडालेला असल्याने राज्य सरकारने दहावीच्या परीक्षा रद्द केल्या आहेत. त्यामुळे विद्यार्थ्यांचे मूल्यमापन कोणत्या प्रकारे करायचे हे अजून निश्चित झाले नसले तरी अकरावीचे ऑनलाईन वर्ग त्वरीत सुरू करून कोपरगाव येथील संत ज्ञानेश्वर कनिष्ठ महाविद्यालयामध्ये सुरुवातीला विद्यार्थ्यांना मूळ संकल्पना समजावून सांगण्यात येणार आहे. त्यासाठी अकरावी विज्ञान व वाणिज्य शाखेच्या वर्गात प्रवेश घेण्यासाठी महाविद्यालयाने ऑनलाईन लिंक प्रसिद्ध केली आहे.
याबाबत अधिक माहिती देताना कनिष्ठ महाविद्यालयाने म्हंटले आहे की, दहावीचा निकाल लागल्यानंतर विद्यार्थ्यांची गर्दीमुळे गैरसोय होऊ नये; यासाठी तात्पुरत्या स्वरूपात प्रवेश देण्यात येत आहेत. विज्ञान शाखेसाठी आयटी इलेक्ट्रॉनिक्स हे वैयक्तिक विषय देखील उपलब्ध आहेत. तसेच जेईई, नीट व सीईटी यांसारख्या विविध प्रवेश परीक्षांचे मार्गदर्शन देखील अकरावी पासूनच करण्यात येणार आहे. तसेच विद्यार्थ्यांच्या चॅप्टर वाईज टेस्ट घेणे, ग्रुप डिस्कशन करणे, प्रत्येक विषयासाठी तज्ञांकडून मार्गदर्शन देणे व विद्यार्थ्यांनी परीक्षेसाठी वेळेचे नियोजन कसे करावे याचेही योग्य मार्गदर्शन करून विद्यार्थ्यांची गुणवत्ता जास्तीत जास्त वाढविण्याचे काम प्राध्यापकांकडून केले जाते. त्यामुळे विद्यार्थ्यांना बाहेर कोचिंग क्लासला जाण्याची गरज भासत नाही, अशी माहिती संत ज्ञानेश्वर विद्या प्रसारक संस्थेचे व्यवस्थापकीय विश्वस्त विशाल झावरे यांनी दिली आहे. ज्या विद्यार्थ्यांनी अद्याप अकरावीच्या वर्गासाठी ऑनलाईन प्रवेश नोंदणी केली नसेल अशा विद्यार्थ्यांनी https://forms.gle/p3nFT7CoGc5kHntE8 या लिंकद्वारे ऑनलाईन फॉर्म भरून आपला प्रवेश निश्चित करावा असे आवाहन केले आहे.


कोणत्याही टिप्पण्या नाहीत